वटसावित्री पौर्णिमेनिमित्त “एक व्यक्ती, एक झाड” मोहिमेस शुभारंभ!

0

महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. शंकरराव गडाख यांनी आज वट सावित्री पौर्णिमा निमित्त एक झाड एक व्यक्ती या अनोख्या उपक्रमाची आज सुरुवात केली. वटवृक्षाची जितकं पूजेच्या निमित्ताने महत्त्व समजते जाते तितकेच महत्त्व पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.

उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. शंकरराव गडाख यांनी ट्विट करत माहिती दिली की “वटसावित्री पौर्णिमेनिमित्त “एक व्यक्ती, एक झाड” या जिल्हा प्रशासनाच्या मोहिमेचा शुभारंभ नेवासा येथील संत श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या बाहेरील प्रांगणात वृक्षारोपण करून करण्यात आला.कोरोना काळात ऑक्सिजनची गरज पाहता ऑक्सिजन देणाऱ्या नवीन झाडांचे वृक्षारोपण करावे लागणार आहे”.

त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे निश्चित कौतुक केलं पाहिजे. कारण वृक्षांची लागवड ही पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. लोकांनी वृक्ष लागवड मोहीम ही गावोगावी रुजवली पाहिजे. त्यांची उचललेले पाऊल हे पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.