स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीत धनंजय मुंडे झाले भावनिक!

0

स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीत धनंजय मुंडे झाले भावनिक!

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आज माजी केंद्रीय मंत्री आणि दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंत्रालयातील प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. भावूक होत धनंजय मुंडे यांनी भावना व्यक्त केल्या.

धनंजय मुंडे म्हणाले की ‘अप्पा, ऊसतोड कामगार बांधवांच्या कल्याणासाठी तुम्ही आयुष्यभर कष्ट केले. लोकसेवेचा तुमचा हा वसा आणि वारसा पुढे नेत असताना तुमच्याच नावाने ऊसतोड मजूर बांधवांसाठी महामंडळ सुरू केले आहे. ऊसतोड कामगार बांधव आणि सर्व समाजासाठी तुम्ही पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आयुष्य वेचेन, हा शब्द देतो.

ऊततोड कामगारांसाठीची तुमची लढाई मी माझ्या खांद्यावर घेतली असून त्यांच्यासाठी आयुष्य वेचेन, अशा शब्दात आठवणी जागवत त्यांनी भावना व्यक्त केल्या. आज लकानेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणी मध्ये भावनिक झालेले धनंजय मुंडे सर्वानाच दिसून आले.

Leave A Reply

Your email address will not be published.