लसीकरण सर्टिफिकेट वरती मोदींच्या सारखा राज्य सरकार फोटो लावणार नाही – अजित पवार

0

सध्या देशभरामध्ये लसीकरण सुरू आहे. लसीकरणाचा वेग मंदावला आहे. लोकांची लसीकरणाच्या साठी झुंबड उडालेली दिसत आहे. लसीकरण गरजेचं आहे मात्र त्या बद्दल केंद्र सरकार फारसे गंभीर असल्याचे दिसत नाही. अशा काळात सुद्धा लसीकरणाच्या नंतर दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रा वर नरेंद्र मोदींचा दिमाखात फोटो दिसत आहे. या बद्दल लोकांच्या मध्ये चांगलीच चीड निर्माण झाली आहे. देशात कोरोनाने मृत्यूचे थैमान घातले आहे अशा परिस्थिती मध्ये नरेंद्र मोदींना जाहिरातबाजी सुचत आहे.

पेट्रोल भरल्यानंतर ज्याप्रमाणे नरेंद्र मोदी यांचा फोटो त्याच प्रमाणे लसीकरणाच्या नंतर नरेंद्र मोदी यांचा फोटो प्रमाणपत्रावरती पाहायला मिळत आहे. अजित पवार म्हणाले ”राज्य सरकारची असे फोटो टाकण्याची भूमिका नाही. राज्यातील जनतेला या गंभीर संकटातून कसं बाहेर काढता येईल, हाच आमचा प्रयत्न असेल, अशी ग्वाही अजितदादांनी दिली.

याच बरोबर वाढत्या महागाई वरून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केंद्र सरकारवरती शेलक्या शब्दांत टीका केली आहे. ” देशात पेट्रोल भरायला गेल्यावरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो दिसतो . शंभर रुपयांनी पेट्रोल आपण त्यांच्या साक्षीने भरतो आहोत असा त्यामागे दृष्टिकोन असावा”.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुण्यामध्ये कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्या नंतर पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Leave A Reply

Your email address will not be published.