
हरियाणामधून निलेश लंके यांच्या कामाची माहिती घेऊन कोविड सेंटर पाहायला आलो – सोनिया दुहान
देशातील आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे नागरिकांना उपचार मिळत नाहीत डॉक्टरांची संख्या फार कमी आहे अशा काळामध्ये कोरोनाशी दोन हात करणे मोठे जिकरीचे काम आहे.
राष्ट्रवादी विद्यार्थी युवती काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दूहान यांनी शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिरास भेट दिली. त्या वेळी बोलत असताना त्या म्हणाल्या “हरियाणातील माझ्या सुमारे वीस ते बावीस हजार लोकसंख्येच्या गावात साध्या प्राथमिक आरोग्याच्या सुविधा देखील नाहीत. गावात डॉक्टर नाहीत. तेथे कोरोना संसर्गाच्या तपासण्या सुद्धा केल्या जात नाहीत”. असे त्यांनी आमदार लंके यांच्या मार्गदर्शनाखाली भाळवणी येथे सुरू असलेल्या शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिरास भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
तसेच सोनिया दोन म्हणाल्या की निवडणुकीच्या काळामध्ये राजकारण करायचे असते आणि इतर वेळी समाजकारण शरद पवार साहेबांची शिकवण आहे की 80 टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण. कोरोणाच्या काळात निलेश लंके यांनी कोविड सेंटर सुरू करून सामाजिक कार्याबद्दल असणारी आपुलकी दाखवून दिली आहे. आम्ही थेट हरियाणामधून लंके यांच्या कामाची माहिती घेऊन कोविड सेंटर पाहण्यासाठी आलो आहोत.