खतांच्या किमती कमी कराव्यात – राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे

0

महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी खतांच्या वाढलेल्या किमती वरून केंद्र सरकारशी पत्रव्यवहार केला आहे. त्यांनी खतांच्या किमती कमी कराव्यात अशी मागणी केली आहे. महाराष्ट्रभरातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने महागाई विरोधात व खतांच्या वाढलेल्या किमती वरून आंदोलन केले आहे. शेतकऱ्यांच्या मध्ये खतांच्या किमती वरून चांगलाच असंतोष निर्माण झाला आहे.

कृषी मंत्री दादा भुसे यांनी ट्विट करत सांगितले आहे की
“खतांच्या किंमती कमी कराव्यात यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने केंद्र शासनाकडे पत्राद्वारे मागणी करण्यात आली आहे. रासायनिक खतांचे वाढीव दर शेतकऱ्यांना परवडणारे नाहीत म्हणून खतांच्या दरामध्ये सबसिडी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे”.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने हा पत्रव्यवहार केला असल्याचे दिसून येत आहे.

शेतकऱ्यांना महागाईचा सामना करावा लागत आहे. कोरोना मुळे शेतमालाला योग्य भाव मिळत नाही तसेच बाजारपेठा बंद असल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशातच ही दरवाढ शेतकऱ्यांच्या दृष्टीने अडचणीची आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.