आमदार रोहीत पवारांच्या वडिलांना कृषीरत्न पुरस्कार जाहीर

0

आमदार रोहीत पवार यांचे वडील श्री. राजेंद्र पवार यांना राज्याचा मानाचा कृषीरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.श्री राजेंद्र पवार बारामती अॅग्रोचे प्रमुख असून या अॅग्रोच्या माध्यमातून त्यांनी कृषीक्षेत्रात अनेक नवनवीन प्रयोग केले आहेत.यापूर्वीही कृषीमंत्री कै. पांडुरंग पुंडकर यांनीही बारामती अॅग्रोला भेट दिल्यावर राजेंद्र पवार आणि बारामती अॅग्रोचे कौतुक केल होत.

दरम्यान कर्जत जामखेडचे आमदार आणि राजेंद्र पवार यांचे सुपुत्र रोहीत पवार यांनी ट्विटरवरून वडिलांच अभिनंदन केल आहे.राजेंद्र पवार यांनी बारामती अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून जागतिक पातळीवरील प्रयोगशील शेती केली आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना राज्याचा 2019 सालचा डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.आमदार लेकान आपल्या वडिलांच भावूक होत अभिनंदन केल आहे.तसेच वडिलांचे शेती संदर्भातील फोटोही ट्विटरवर शेअर केले आहेत.इतर पुरस्कार विजेत्यांचही त्यांनी अभिनंदन केले आहे.

वडिलांबद्दल सांगताना रोहीत पवार म्हणाले,कोणतीही अपेक्षा न ठेवता केवळ समाजाच्या हितासाठी झटणाऱ्या बाबांचा हा सन्मान आनंददायी आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.