म्हणून कोणाचा बाप नाही पण कोणाचीतरी आई रामदेव बाबांना नक्की अटक करेल – रुपाली चाकणकर

0

योगगुरू रामदेव बाबा यांच्या वक्तव्याने राजकारण चांगलेच तापले आहे. रामदेव बाबा यांना अटक करण्याची मागणी सगळीकडून होत होती. कारण त्यांनी केलेलं वक्तव्य हे गांभीर्याने विचार करायला लावणारे होते.

देशात कोरोनाची परिस्थिती भंयकर असताना योग गुरु बाबा रामदेव यांनी अ‍ॅलोपॅथी उपचार पद्धतीवर टीका केली होती. यावरुन इंडियन मेडिकल असोसिएशननं आक्रमक पवित्रा घेतला होता. त्या वरून सगळीकडून त्यांना अटक करण्याची मागणी जोर धरत होती. अशातच त्यांचे “कोणाचा बाप मला अटक करू शकत नाही” असा प्रकारचे वक्तव्य व्हायरल झाले. यावर रुपाली चाकणकर यांनी चांगलीच मजेशीर टिप्पणी केली आहे.

“कोणाचा बाप मला अटक करू शकत नाही” हे बाबा रामदेव यांचं म्हणणं अगदी योग्य आहे. ते असे सलवार कुर्ता घालून पळत असताना पुरुष अधिकारी त्यांना अटक करू शकणार नाही, त्यासाठी महिला अधिकारी आवश्यक आहे. म्हणून कोणाचा बाप नाही पण कोणाचीतरी आई रामदेव बाबांना नक्की अटक करेल.

अशा आशयाचे ट्विट करत त्यांनी रामदेव बाबा यांचा सलवार कुडता घातलेला फोटो पोस्ट केला आहे. जो फोटो रामलीला मैदानावर आंदोलनाच्या वेळी पळून जाण्याच्या सलवार कुडता घातला होता त्या वेळीचा आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.