कोल्हापूर शहर बनू लागलय कोरोनाच हॉटस्पॉट

0

कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामीण भागातील १२३ गावांनी कोरोनाचा शिरकाव गावात होऊ न देण्याची कौतुकास्पद कामगिरी करून दाखवली आहे.ग्रामस्थ कोरोनाचे नियम तर पाळतातच पण गावात येणारा पाहुणाही या नियमांचा भाग बनावा अशी दखल ते घेतात.परिणामी ही गाव १००टक्के कोरोना मुक्त असून गावात एकही कोरोना रुग्ण आढळला नाही की दगावला नाही.कोल्हापुरात तशीही कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात होती,परंतु दुसरी लाट वाढेल तस चित्र बदलताना दिसून येत आहे.

जिल्ह्यात लसीकरण जोरदार सुरू असून गेल्या महिन्यापर्यंत लसीचा पुरवठा सुरळीत होता परंतु गेले काही दिवस लसीचा तुटवडा जाणवत असून लसीकरण केंद्र बंद करण्यात आली आहेत.किंवा लस उपलब्ध नाही कधी मिळेल सांगता येत नाही अशी उत्तर मिळू लागली आहेत.चार दिवसापूर्वी जिल्ह्यात रेमेडिसेव्हरचाही तुटवडा निर्माण झाला होता.

प्रशासन हळूहळू वाढणारी रुग्णसंख्या पाहता शासनाचे नियम पाळण्याचे लोकांना आवाहन करत आहे,परंतु संचारबंदीला लोक जुमानताना दिसून येत नाही आहेत.भाजी, किराणा, तसेच इतर खरेदीही मोठ्या प्रमाणावर सातत्यान बाहेर पडून करत आहेत.कोल्हापूर जिल्ह्यात कालअखेर ४५२ कोरोनो रुग्ण सापडले आहेत.पैकी कोल्हापूर शहरात १९२रुग्ण सापडले आहेत तर हातकणंगलेत५७, करवीर५०, आजरा, भुदरगड प्रत्येकी १७, पन्हाळा२०, कागल१६ अशाप्रकारे रुग्ण पसरू लागले आहेत जिल्ह्यात सध्या ३१५० अॅक्टीव्ह रुग्ण असून २१९ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.तर १२ रुग्णांचा कोरोनान मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर शहरात पेठेत असणारी दाटीवाटीची घर भविष्यात कोरोना वेगाने पसरवू शकतात.पहिल्या लाटेतही शहरात रुग्णसंख्या जास्त होती.आतातर समूह संसर्ग सुरू झाल्याने सुरुवातीला किरकोळ दिसणारी ही रुग्णसंख्या भविष्यात वाढू शकते.परिणामी स्थानिक पातळीवर कडक पावल उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.