
मातृत्वसुख या जगातील अतिशय पूजनीय व नवजन्म देणारे आहे. पिता झाल्यावरही इतकेच सुख लाभते. भारतीय परंपरेत विवाहानंतर मुलात आगमन दोन जीवांची प्रगती तसेच दोन घराण्याचा वंश वाढण्यात प्रतिक समजतात. परंतु नवीन पिढी विवाहापूर्वी शारीरिक संबंध बनवते आणि त्यातून मुलगी प्रेग्नंट झाल्यास ती कॉन्ट्रॅसेप्टीव घेते, परिणामी एक जीव मुकतो. तरुणाईने खबरदारी घ्यावी तसेच करियर, इतर छंद जोपासून विवाहानंतरच शारीरिक संबंध बनवावे. जेणेकरून सुखद मातृपितृत्वाची अनुभूती येईल. वारंवार गर्भ पाडणाऱ्या गोळ्या आरोग्यासाठी हानिकारक असतात. बाळंतपण म्हणजे स्त्रीचा दुसरा जन्म समजला जातो. नका नवीन जीवाला जन्म देण्याची जबाबदारी ती पार पाडत असते. म्हणूनच ती पूजनीय ठरते. बदलत्या काळात आय व्ही एफ तंत्रज्ञान, सरोगसी प्रकार आले असले तरी नैसर्गिक मातृत्व आणि डिलेव्हरी ही निसर्गाची रचना आहे आज आपण तीच बघणार आहोत.
स्त्रियांच्या मासिक धर्मानंतर म्हणजेच पिरियडनंतर ६ ते १४ दिवस गर्भ धारणेसाठी अनुकूल असतात. या दिवसात स्त्री पुरूष शारीरिक संबंध झाल्यास बीजधारणा होते. ओव्हेलेशन होय. यानंतर येणारा परेड जर चुकला, स्त्रीला उलटी, चक्कर मळमळ जाणवली तर गर्भधारणेची शक्यता डॉक्टरकडून तपासाची. यंग जनरेशन प्रेगा न्यूज वापरतात. तरीही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो. पहिल्या २ महिन्यात गर्भाच्याभोवती पाण्याच्या पिशव्या तयार होतात. नंतर २ महिन्यात नाळ तसेच गर्भाला आकार येतो. यात ६ आठवड्यात डोक, कान, असे आकार दिसू लागतात.
९ ते १३ आठवड्यात नाळ पूर्ण जोडली जाते.या अवस्थेला आॅरगोने जेनेसस म्हणतात. बाळाचे हात, पाय, कान, नाक असे आकार दिसू लागतात. सर्वसाधारणपणे लांबी ५.३ से.मी असते. 3 महिन्यात जननांग दिसतात. बाळ व आई एकमेकांना जोडले जातात. ४ महिन्यात बाळ हलू लागत.पोट दिसू लागत. बाळाचे ह्रदय ठोके जाणवतात. वजन वाढत. ५ महिन्यात बाळ अंगठा चोखू लागत, त्याची लांबी व वजन वाढते. या दिवसात काळजी घ्यावी लागते. स्त्रीला आहार, मन प्रसन्न ठेवाल लागत. तसेच या महिन्यात केस तयार होतात.
६ महिन्यात बाळाचा रंग लाल होतो. रक्त कौशिक तयार झालेल्या असतात. लिव्हर, यकृत काम करू लागत. बाळ आवाजावर रियाक्ट होत. ७ महिन्यात बाळ पूर्ण तयार झालेल असत परिणामी प्री मॅच्युअर डिलेव्हरी झाल्यास बाळ जगू शकत. ८ महिन्यात बाळ आवाज ऐकण, रियाक्ट होण करू लागत डोळे उघडू लागत. हालचाल कमी होते गर्भाशय कमी पडू लागत. ९ महिन्यात मेंदू विकसित होतो. बाळ बाहेर येण्यासाठी तयार झाल्यावर स्त्रीला खूपवेळ पोटात दुखू लागत. नैसर्गिकरित्या बाळ योनीमार्गातून बाहेर येताना डोक प्रथम बाहेर येत आणि उरलेले शरीर नंतर बाहेर येत. नाळ कापताच बाळ बाहेर जगण्यास तयार होते.सिझेरियनमध्ये पोटाला छेद देत बाळ बाहेर काढतात.
नवी उमेद नव जग पाहण्यास एक जीव जन्म घेतो आणि माणसांच्या गर्दीत सामावून जातो. परत स्वतासारखाच जीव निर्माण करण्यास सज्ज होतो. जन्म देणारी मातृ पितृ कृतार्थ होतात. निसर्गाची मानवाला सुख आणि वंशवृध्दी देणारी ही रचना आवडली असल्यास आमच्या पेजला अवश्य लाईक