फक्त ३ दिवसात गुडघे आणि कंबरदुखी बंद होईल, वापरा हा उपाय

0

गुडघेदुखी आणि कंबरदुखी त्रस्त करत असेल तर दैनंदिन कामसुध्दा व्यवस्थित पार पाडता येत नाहीत. भारतीय परंपरेत जायफळचा वापर फार पुरातन काळापासून चालत आलेला आहे.  कोणत्याही गोड पदार्थात जायफळ उगाळून आवर्जून घालत जात. जायफळाने पदार्थ सुगंधित होण्याबरोबरच पदार्थाची चव वृध्दिंगत होते. जायफळाने झोप चांगली येते. निद्रानाश असल्यास जायफळ कोमट दुधात उगाळून किंवा खिसून घातले जाते. आणि असे दूध पिल्यास निद्रानाशात आराम मिळतो. सर्दी खोकला झाल्यासही जायफळ दुधाबरोबर सेवन केल जात. गुडघे दुखी आणि कंबर दुखीत जायफळ कस उपयोगी पडत चला पाहूया.

साहित्य  :

१) जायफळ पूड  – १ चमचा

२) मोहरीच तेल  – २ चमचे

३) हळद  – पाव चमचा

कृती  :

सर्वप्रथम जायफळ खिसून घ्या. आता एका छोट्या वाटीत मोहरीच तेल गरम करून घ्या. आता या तेलात जायफळ आणि पाव चमचा हळद घाला व दोन ते तीन मिनिटे गरम करा. आता हा लेप कोमट असतानाच दुखरी कंबर आणि गुडघ्यांवर किमान ५ मिनिटे चोळा. तासभर तसाच ठेवून हा लेप कोमट पाण्याने धुवून घ्या.

वरील उपायांचा कोणताही अपाय होत नाही. संपूर्णपणे आर्यवेदिक असणारा हा उपाय जरूर अवलंबा साधारण सलग ३ दिवस हा उपाय दिवसातून दोनदा केल्यास गुडघेदुखी व कंबरदुखीत आराम मिळतो.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.