
आरोग्यपूर्ण किडनी आपल्या शरीरात लावलेला एक असा फिल्टर आहे, जो शरीरातून विषारी घटक बाहेर काढतो, यासाठी किडनीचे आरोग्य महत्वाचे ठरते. किडनी आरोग्यासाठी मूत्र विसर्जन वेळची वेळी होणे तसेच दिवसभरात साधारण दोन ते तीन लीटर पाणी पिणे गरजेचे आहे. किडनीचे आरोग्य जपण्यासाठी मद्यपान हानिकारक असून अल्कोहलने किडनी बिघडू शकते. आपण आपल्या आहारात काही पदार्थ आवर्जून खाल्ले पाहिजे त्यांची यादी पुढीलप्रमाणे
१) लिंबू – लिंबू रस किडनी विकासावर लाभदायक असून लिंबू रसाने मूत्र मार्गातील संसर्ग दूर होतो. परिणामी कोमट पाण्यातून लिंबू रस घ्यावा.
२) लसून – किडनीसाठी लसून अतिशय लाभदायक आहे. यासाठी आहारात लसूनचा समावेश करा.
३) शिमला मिरची – शिमला मिरचीच्या नियमित सेवनाने किडनी ठिक राहते. अँटीऑक्सिडेंट, व्हिटॅमिन सी भरपूर असल्याने किडनी निरोगी राहते.
४) पालक – पालकात आढळणारे व्हिटॅमिन ए, सी, के, आयर्न, मॅग्नेशियम आणि फोलेट, बीटा-कॅरोटीन किडनीला हेल्दी ठेवते. अननस (Pineapple)
५)अननससुद्धा – किडनीसाठी लाभदायक आहे. यामुळे इम्यूनिटी चांगली राहते, यातील फायबरमुळे किडनी संबंधित आजार कमी होतात.
६) कलिंगड – कालखंडात भरपूर मात्रेत पाणी असते परिणामी कलिंगड खाल्ले असता किडनी साफ राहते.
७) फ्लॉवर – फ्लॉवरमध्ये भरपूर व्हिटॅमिन सी, फोलेट, फायबर, इंडोल्स, ग्लूकोसिनोलेट्स आणि थियोसायनेट्स असते यामुळे किडनी आरोग्यपूर्ण राहते.
वरील उपाय पूर्णपणे आहारावर आधारित आहे, किडनीबाबत आजार असल्यास डाॅक्टरांचा सल्ला जरूर घ्या.