
घरात इथे ठेवा ३ नाणी ! कष्टाला यश येऊन होईल धनलाभ, ७ दिवसात येईल अनुभव
मित्रांनो बरेचदा आपण खूप कष्ट करतो, प्रयत्न करतो पण त्यामानाने धनलाभ होत नाही. अशावेळी आपण खूप उपाय करतो. परंतु घरात सकारात्मक ऊर्जा असणे तसेच घरातील वातावरण प्रसन्न, आनंददायी राहणे यासाठी गरजेचे असते. मित्रांनो आज आपण असाच एक सोपा व भक्तिमय उपाय पाहणार आहोत. अनेकांनी हा उपाय करून पाहिला असून त्यांना त्याचा फायदा झाला आहे.
या उपायात आपल्याला लाल रंगाच्या कापडाचे तीन तुकडे घ्यायचे आहेत. तसेच १₹ किंवा २₹, ५₹, १०₹, यांपैकी जे उपलब्ध असेल त्या पैशाची तीन नाणी, ठोकळे, सिक्के घ्यायचे आहेत. म्हणजेच १रुपयाची तीन नाणी किंवा २, ५, १० यांपैकी उरलेल्या पैशापैकी जी मिळतील त्या एकाच पैशाची तीन नाणी घ्यावयाची आहेत. ही एकाच पैशाची तीन नाणी दूधमिश्रित पाण्याने धूवून घ्यायची आहेत. ही तीन नाणी आता स्वच्छ पूसून घ्यायची व लाल रंगाच्या कपड्याचे जे तीन तुकडे आपण घेतलेत त्यात एकेक करत पुरचुंडीप्रमाणे बांधायची आहेत. आता या तीन पुरचुंड्या माता लक्ष्मी, श्री विष्णू, श्री स्वामी समर्थ यांपैकी एका दैवताच्या पायाशी ठेवायची आहेत.
नाण्यांची तीन पुरचुंडी ठेवून हात जोडून नमस्कार करत ज्या देवतेच्या पायाजवळ पुरचुंडी ठेवलीत त्यांना किंवा स्वामींजवळ ठेवल्यास श्री स्वामी समर्थांची मनोभावे प्रार्थना करावी तसेच स्वताची मनोकामना सांगावी व आशीर्वाद घ्यावेत. प्रार्थनेत म्हणावे, हे माते, हे विष्णू किंवा श्री स्वामी समर्थ माझ्या घरातील आर्थिक अडचणी दूर होऊ देत, घरात सकारात्मक ऊर्जा येऊ दे, आनंद, समाधान मिळू दे, घरातील सर्वांना आरोग्य मिळू दे अशी विनंती करावी. प्रार्थना झाल्यावर नमस्कार करून आशीर्वाद घ्यावा, नामस्मरण करावे. हा सर्व पूजाविधी पार पाडल्यानंतर नाण्याच्या तीन पुरचुंड्या उचलून आपल्या घराच्या मुख्य द्वारापाशी उजव्या बाजूला बांधून ठेवायच्या आहेत. यामुळे घरात सकारत्मकता येते व ७ दिवसातच आपल्याला याचा फरक जाणवू लागतो. घरात धनसंपत्ती येते व आनंदवृध्दी होते.
अत्यंत प्रभावशाली असलेला हा उपाय जरुर करून पाहा. या उपायाचा कसलाही खर्च नाही तसेच कोणालाही अपाय नाही. तुम्ही जर मनी प्लांट, फेंगशुईवर खर्च करत असाल तर हा उपाय जरुर करून पाहा. मित्रांनो श्री स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला जरुर लाईक करा.लेख शेअर करा.