मराठी दिग्दर्शक केदार शिंदेंने २५ वर्षांनंतर केले दुसरे लग्न

0

शाहीर साबळे यांचा नातू ही ओळख ठसठशीत करत केदार शिंदेंनी स्वताची उत्तम दिग्दर्शक अशी वाटचाल केली. केदार शिंदे आणि भरत जाधव या जोडगोळीने एकेकाळी रंगमंच गाजवला. सही रे सही, श्रीमंत दामोदरपंत, या नाटकांनी लोकप्रियतेचे उच्चांक गाठले. श्रीयुत गंगाधर टिपरे, हसा चकट फू, घडलय बिघडलय या त्याच्या मालिकाहीत्रलोकप्रिय ठरल्या. अग बाई अरेच्चा या त्याच्या चित्रपटाने अजय अतुलच संगीत गाजल.मध्यमवर्गीय मानसिकतेचा अचूक वेध घेत केदार शिंदेने विनोदाचा नवा पायंडा पाडला. सध्या केदार शिंदे त्याच्या दुसर्यांदा केलेल्या लग्नाने चर्चेत आहे. चला बघूया केदार शिंदेने का केल दुसर लग्न.

केदार शिंदे आणि बेला यांच प्रेम कॉलेजातच जुळून आल. या प्रेमाची परिणीती २५ वर्षांपूर्वी ९ मे रोजी विवाहात झाली. या दोघा प्रेमी युगुलाने ९ मे रोजी कोर्ट मॅरेज केल होत. या लग्नात भरत जाधव, अंकुश चौधरी हे मित्र उपस्थित होते. आता कोर्ट मॅरेज झाल्याने या लग्नात कोणतेही पारंपारिक विधी पार पडले नाहीत. यामुळे हळद लागणे, मेंदी, उखाणा अशी हौसमौज या दोघांना अनुभवता आली नाही. दोघांनाही याची रुखरुख जाणवत होती. केदारची मुलगी सना शिंदे हिनेही आई वडिलांची हौस करायच ठरवल आणि केदार – बेलाने आपल्या २५ व्या वाढदिवसाचा रौप्य महोत्सव साधत राहत्या घरीच पारंपारिकरितीने दुसर्यांदा विवाह केला.

केदार शिंदे सध्या चांगलाच स्थिरस्थावर झाल्याने त्याने या विवाहासाठी मनसोक्त खरेदी केली. या विवाहात आदेश बांदेकर व त्यांची पत्नी सूचित्रा यांनी बेलाचे कन्यादान केले आहे. या विवाहाला मित्रमंडळी आणि नातेवाईकांनी आॅनलाईन उपस्थिती लावली. केदारची मुलगी सना शिंदे हिने आई – वडिलांची राहिलेली हौसमौज पूर्ण केली. अस तिन एका पोस्टमध्ये शेअर केले आहे. या पोस्टमध्ये तिने आई – वडिलांना शुभेच्छाही दिल्या आहेत. कोर्ट मॅरेजची २५ वर्षे यशस्वी पार पाडलेल्या या जोडप्याने परत एकदा लग्नगाठ बांधत एकमेकांची साथ देण्याची तयारी केली आहे. या विवाह सोहळ्याला मराठी नाट्य, चित्रपट सृष्टीतून शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.