कार्तिक पडला त्याच्या गाडीच्या पाया; व्हिडीओ झाला प्रचंड प्रसिद्ध…

0

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन नुकताच कोरोनामधून बरा झाला आहे. तो समाज माध्यमांवर सतत क्रियाशील असतो. सध्या कार्तिक समाज माध्यमांवर प्रसिद्ध होण्याचे कारण म्हणजे त्याचा गाडीला पाया पडतानाचा व्हिडीओ होय. कार्तिकने आपली लॅम्बॉर्गिनी URUS ही गाडी इटलीमधून खरेदी केली आहे. या गाडीची किंमत साडे चार करोड रुपये इतकी आहे. एवढंच नाही तर कार्तिकने ही आपली ड्रीम कार भारतात आणण्यासाठी ५० लाख रुपये ही वेगळी रक्कम मोजली आहे.

कार्तिकने लॅम्बॉर्गिनी URUS या आपल्या लक्झरी कारमधून सफर केली. त्यावेळचे त्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यात तो आपल्या गाडीच्या पाया पडताना दिसत आहे. कार्तिक गाडी चालवत होता तेव्हा त्याला माध्यमाच्या प्रतिनिधींनी घेराव घेतला. त्यांना पाहून कार्तिकने गाडी थांबवली. तो गाडीतून खाली उतरला आणि चक्क गाडीच्या पायाच पडला. अर्थात त्याने गाडीच्या बोनेटला हात लावला. मात्र, ते जणू गाडीच्या पाया पडत आहे असंच दिसत आहे.

सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हायरल भयानीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तो म्हणतो की, कार्तिकने स्वतःच्या कष्टाच्या कमाईने गाडी खरेदी केली म्हणून तो गाडीला नमस्कार करत आहे. कार्तिकचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही जण याला नाटकं म्हणत आहेत तर काही जण कार्तिकसाठी खूश आहेत.

कार्तिकने २०१७ मध्ये एक बीएमडब्ल्यू गाडी खरेदी केली होती. २०१९ साली कार्तिकने आपल्या आईला एक गाडी भेट म्हणूनही दिली होती.आणि आता हि लॅम्बॉर्गिनी URUS लक्झरी कार त्याने खरेदी केली.कार्तिक लवकरच ‘भूल भूलैय्या’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात अभिनेत्री कियारा अडवाणी दिसेल. हा चित्रपट एक हॉरर कॉमेडी आहे. तसेच करण जोहरच्या ‘दोस्ताना २’ या चित्रपटातही कार्तिक पाहायला मिळणार आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.