
करीना कपूरच्या मास्कची चर्चा सर्वत्र, किंमत ऐकून तुम्ही देखील व्हाल थक्क…
राज्यात करोना रोग्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आलिया भट्ट,अक्षय कुमार, विकी कौशल, गोविंदा, कतरिना कैफ,परेश रावल, भूमी पडणेकर अशा अनेक कलाकरांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली. त्यामुळे सर्वचजण आता योग्य ती काळजी घेत आहे. अशात बॉलिवूडची अभिनेत्री करीना कपूर खानने तोंडला लावलेल्या मास्कने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या मास्क विषयी समाज माध्यमांवर चर्चा सुरु आहे.
नुकताच करीना कपूर खानने समाज माध्यमांवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना मास्क लावण्याचे आवाहन केले आहे. या पोस्टमध्ये तिने तोंडाला मास्क लावून फोटो शेअर केला आहे. करीनाने वापरलेल्या या काळ्या मास्कची सध्या समाज माध्यमांवर जोरदार चर्चा रंगली आहे. हे मास्क दिसायला अगदी साधे असले तरी त्याची किंमत ऐकून थक्क व्हाल
पोस्ट केलेल्या फोटोमध्ये करीनाने तोंडाला लावलेल्या मास्कवर LV असे लिहिलेले दिसून येत आहे. परंतु हा मास्क लावण्याचा वेगळा काही विचार नाही, किंवा कोणताही प्रोपोगंडा चालवणे हा या मागचा हेतू नाही असे तिने स्पष्ट मत व्यक्त केलेआहे. तसेच ती सर्वांना मास्क लावण्याचे आवाहन करत आहे
करीनाने लावलेला काळ्या रंगाचा मास्क अगदी साधा आहे. पण त्याची किंमत मात्र $355 डॉलर एवढी आहे. म्हणजेच जवळपास २४ हजार ९९४ रुपये इतकी. करीनाच्या या मास्कने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. परंतु सध्या करीनाच्या या महागड्या मास्कची चर्चा न करता तिने केलेल्या आवाहनाला विचारात घेऊन मास्क लावणे आणि करोना होणार नाही याची काळजी घेणे महत्वाचे आहे.