
कपिल शर्मा शो फेम सुमोना चक्रवर्ती कोरोनामुळे गंभीर आजाराच्या शेवटच्या स्टेजला
कपिल शर्मा रियालिटी शोमधून पुढे आला. अत्यंत मेहनतीन आणि कलेच्या जोरावर त्याने अनेक स्टेज शो गाजवले आहेत सोनी टिव्हीवरील ही मालिका तुफान टि आर पी खेचत होती. अनेक रियालिटी शोमधून कपिल शर्मा शो अत्यंत लोकप्रिय ठरलेला आहे.
कपिल शर्मा शोमधील अनेक पात्रांपैकी सर्वच रसिकांच्या ह्रदयात जागा मिळवणारी सुमोना शोमध्ये वेगवेगळी पात्रे निभावत असते. कपिलची बायको म्हणून सातत्याने भूमिका निभावणारी सुमोना काही चित्रपटातही झळकलेली आहे. तसेच सुमोना चक्रवर्ती बडे अच्छे लगते है या मालिकेत तिने राम कपूरच्या छोट्या बहिणीचे काम केले होते.
सुमोना सध्या अलिप्तवासात असून टेलिव्हिजन इंडस्ट्रीत कुठेही दिसत नाही आहे. सुमोना चक्रवर्तीला एक गंभीर आजार झाला असून ती आजाराच्या चौथ्या स्टेजला पोहोचली आहे. सुमोनाला एंडोमेट्रीयोसीस नावाच्या गंभीर आजाराने जखडले असून २०११ मध्ये तिला हा आजार असल्याचे निदान झाले आणि अजूनही ती या आजारासोबत लढत आहे. सुमोनाने नुकतेच सोशल मिडीयाच्या इंस्ट्राग्राम अकौंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. लॉकडाऊनमुळे मी इमोशनली खूप जास्त कमकुवत झाले आहे. सोबतच माझ्या हातात कोणतेही काम नाहीये मात्र आपल्या पूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझ्यावरच आहे. मी इमोशनली खूपच कमकुवत झाले आहे. आणि मी आतून पूर्णपणे तुटलेली आहे. हे सगळ माझ्यासाठी खूप त्रासदायक असल तरी मी तुमच्यासोबत शेयर करत आहे. मला सर्वांच्या प्रार्थना गरज आहे.