६ जून हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा होणार – हसन मुश्रीफ

0

 

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा हा महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात संपन्न होतो. महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीने हा दिवस सन्मानाचा दिवस आहे महाराष्ट्रभरातून हजारो लोकांची गर्दी या सोहळ्यास होत असते. आपला अभिमान, स्वाभिमान, आणि प्रेरणा देणारा दिवस म्हणून या दिवसा कडे पाहिले जाते. याच गोष्टीला स्वातंत्र्याची, स्वराज्याची, आणि सार्वभौमत्वाची प्रेरणा देणारा हा दिवस आहे असेही समजले जाते. महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या कार्यालयात हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

सध्याच्या कोरोनाच्या परिस्थिती मध्ये सर्व नियमांचे पालन करत पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत या ठिकाणी शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. १ जानेवारी २०२१ रोजीच्या परिपत्रकानुसार सर्व मुख्य कार्यकारी यांना आदेश दिले आहेत. महाराष्ट्राच्या दृष्टीने ही गोष्ट निश्चित अभिमानास्पद गोष्ट आहे राज्य भरा मध्ये मोठ्या थाटामाटात शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.