“मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे”; जितेंद्र आव्हाड

- Vaishnav Jadhav

0

मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपच्या महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी आव्हांडांवर विनयभंगाचा आरोप केला आहे. त्यानंतर आव्हाड यांनी ट्विट करत आपण आमदारकीचा राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाड यांच ट्विट- 

पोलीसांनी माझ्या विरुद्ध ७२ तासात २ खोटा गुन्हा दाखल केला आणि तोही ३५४ ,., मी ह्या पोलिसी आत्याचारा विरुद्ध लढणार … मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतो आहे,,. लोकशाहीची हत्या .. उघड्या डोळ्यांनी नाही बघू शकत नाही, असं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कळव्यातल्या एका पुलाच्या उद्घाटनाला गेले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत जितेंद्र आव्हाडही होते. त्यावेळी मुख्यमंत्री बाहेर पडत असताना त्यांच्या गाडीबाहेर गर्दी झाल्याचं एका व्हिडीओत दिसत आहे. त्यावेळी जितेंद्र आव्हाड गर्दीतुन वाट काढत असताना एका महिलेच्या खांद्याला हात लावून आव्हाडांनी या महिलेला बाजूला सारलं. यानंतर संबंधित महिलेने आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

सोबतच, काही दिवसांपुर्वी जितेंद्र आव्हाड यांना हर हर महादेव चित्रपटासंदर्भात पोलिसांनी अटक केली होती. त्यांना एक दिवस तुरूंगात ठेवन्यात आलं होतं. यानंतर त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्यातच आता पुन्हा आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण खवळलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.