पंडित नेहरूंच्या स्मृतिदिनानिमित्त अटल बिहारी वाजपेयींचा व्हिडिओ शेअर करत जयंत पाटलांचा भाजपला टोला.

0

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची समाज माध्यमांवर व्यवस्थित प्लॅनिंग बदनामी करण्यात आली. या पाठीमागे कोण होते उद्देश काय होता हे सांगायची गरज नाही. मात्र खोटी माहिती पसरवून लोकांच्या मनात गैरसमज निर्माण केला. अशा प्रकारचे वागणे ही आपल्या देशाची राजकीय संस्कृती नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले
“गेल्या काही वर्षांत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बदनामीची एक शिस्तबद्ध मोहीम या देशात एका विशिष्ट वर्गाकडून चालवली जात आहे. मात्र या वर्गाकडून पंडित नेहरूंची उंची कितीही कमी करायचा प्रयत्न केला, तरीही ती कमी होणार नाही. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा कायमच या देशामध्ये सन्मान होत राहिला आहे. तसेच यापुढेही होत राहील” असे जयंत पाटील म्हणाले.

१९९९ सालीच्या अविश्वास ठरावाच्या वेळी केलेल्या भाषणात अटल बिहारी वाजपेयी यांनी पंडित नेहरू यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला होता. त्यांच्या कार्याची महती या मधूनच दिसून येते. हा अनोखा व्हिडिओ शेअर करत जयंत पाटील यांनी पंडित नेहरू यांना स्मृतिदिना निमित्त अभिवादन केले!

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.