
जयंत पाटील यांनी केले अंगणवाडी सेविकेचे कौतुक!
“आशाताई रेलू वसावे” या अंगणवाडी सेविका आहेत. त्या स्वतः गरोदर स्त्रिया, लहान बालक यांच्यासाठी आहार देण्याचे काम अशा काळात सुद्धा करत आहेत. त्या ही सगळी सेवा करण्यासाठी १८ किलोमीटर नाव वल्हवत गरोदर महिला व लहान बालकांसाठी आहार पोहोचवत आहेत. त्यांचे हे कार्य, कामाच्या बद्दल ची निष्ठा ही खूपच कौतुकास्पद आहे.
सातपुडा पर्वत रांगेतील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील चीमलखेड या आदिवासी भागात त्या अंगणवाडी सेविका म्हणून काम पाहतात. कोरोनाच्या काळात एकही बालक कुपोषित राहू नये म्हणून त्या तब्बल १८ किलोमीटर नाव वलव्हत नर्मदा नदी मधून ४४ डिग्री तापमानात त्यांनी काम करत सेवा देण्याचे काम केलं आहे. त्यांच्या विभागात ११२ बालके, १२ गरोदर स्त्रिया, ४७ कुमारी माता यांची कोरोनाच्य काळात उपासमार झाली असती. मात्र त्यांच्या या श्रमामुळे सगळ्यांच्या पर्यंत आहार पोहचू शकला.
सावित्रीमाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांच्या कर्तृत्ववाचा सन्माना केला. स्वतः जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ट्विट करत त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे!