जयंत पाटलांनी साधला सुयश जाधवशी संवाद, टोकियो पॅराऑलिम्पिकसाठी दिल्या शुभेच्छा!

0

खेळाडूंच्या पाठीमागं राज्य सरकार खंबीरपणे उभा असेल तर खेळाडूंना अधिकाधिक चांगली कामगिरी करण्यास यश मिळते. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सुयश जाधव या दिव्यांग खेळाडूस शुभेच्छा दिल्या.

जयंत पाटील म्हणाले की ‘आपण टोकियो पॅराऑलिम्पिक २०२१ मध्ये चांगले यश मिळवल्यास शासनातर्फे तुमचा योग्य सन्मान केला जाईल, असे आश्वासन दिले आहे. पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी सुयश जाधव या दिव्यांग जलतरणपटूला जयंत पाटील यांनी व्हिडीओ कॉलव्दारे शुभेच्छा दिल्या आहेत.

सोलापूरातील करमाळा तालुक्यातील दिव्यांग जलतरणपटू सुयश जाधव यांच्याशी आज व्हिडीओ कॉलद्वारे जयंत पाटील यांनी संवाद साधला. सुयश यांची निवड यंदाच्या टोकियो पॅराऑलिम्पिक २०२१ स्पर्धेसाठी भारताच्यावतीने निश्चित झाल्याचे वर्तमानपत्रातून समजल्यानंतर जयंत पाटील यांनी संपर्क साधला. सुयश ने २०१६ साली झालेल्या रियो पॅराऑलिम्पिक स्पर्धेतही भाग घेतला होता. तसेच २०१८ साली त्यांना महाराष्ट्र शासनाचा मानाचा एकलव्य पुरस्कार देण्यात आला तर २०२० साली त्यांना भारत सरकारचा अर्जून पुरस्कार देखील देण्यात आला. सुयश ची कामगिरी ही थक्क करणारी आहे. सुयश यांना जागतिक पातळीवर सुयश यांनी आतापर्यंत १२३ मेडल्स मिळवले आहेत. शारीरिक आव्हानांवर मात करत त्यांनी मिळवलेले हे यश खूपच कौतुकास्पद असल्याचे जयंत पाटील म्हणाले. शारीरिक आव्हानांवर मात करत त्यांनी मिळवलेले हे यश खूपच कौतुकास्पद असल्याचे जयंत पाटील म्हणाले.

जागतिक पातळीवर विविध स्पर्धेत भाग घेऊन यश मिळवणाऱ्या दिव्यांग खेळाडूंचा मागील सरकारने यथोचित सन्मान केला नाही अशी खंत सुयश जाधव यांनी जयंत पाटील यांना यावेळी बोलून दाखवली. मात्र जयंत पाटील यांनी आमचे सरकार तुमच्या गौरवासाठी कायम पुढे असेल असा शब्द सुयशला दिला.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.