लढण्याची जिद्द दाखवणाऱ्या १०८ वर्षांच्या आजीचा जयंत पाटलांनी केला सत्कार!

0

सुरुवातीच्या काळात लसीकरणाच्या बाबतीत बाबतीत लोकांच्या मध्ये समज आणि गैरसमज फार निर्माण झाले होते. तरुण सुद्धा सुरुवातीच्या काळात कोरोना प्रतिबंधात्मक रस घेण्यास धजावत नव्हते अशाच कालावधीमध्ये एकशे आठ वर्षाच्या आजीबाईंनी कोरोनाची लस घेतली. जगण्याच्या प्रती असणारी त्यांची जिद्द आणि चिकाटी पाहून सर्वांनाच चांगला धक्का बसला होता.

त्या आजींनी सोमवारी दुसरा डोस घेतला. त्याबद्दल त्या आजींचा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी साडीचोळी देऊन सत्कार केला. तसेच, सर्वांनी कोरोनाची लस घेण्याचे आवाहन केले. सर्वांना आवाहन केलं आहे.

या आजी इस्लामपूर शहरातील टकलाईनगरमधील आहेत. सगळीकडे लसीच्या बाबतीत संभ्रमाचे वातावरण असताना त्यांनी पुढाकार घेऊन लस घेतली ही फार मोठी गोष्ट आहे. ही माहिती जयंत पाटील यांनी ट्विट करत दिली आहे. तसेच ते म्हणाले की लसीकरण हेच कोरोनावरील प्रभावी शस्त्र आहे. त्यामुळे प्रत्येकाने लस घ्यावी आणि कोरोनाविरुद्ध या लढ्यात सहभागी व्हावे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.