पाच वर्ष सत्तेत राहायला हिम्मत लागते,जयंत पाटलांच्या देवेंद्र फडणवीसांना कानपिचक्या

0

पंढरपूर पोटनिवडणुकीत समाधान अवताडेंच्या प्रचाराप्रित्यर्थ देवेंद्र फडणवीसांनी सभांचा धडाका लावला आहे.एकासभेदरम्यान भाषणात फडणवीस म्हणाले,”सरकार कधी पाडायच तुम्ही माझ्यावर सोपवा.”देवेंद्र फडणवीसांच्या या वाक्याची सर्वत्र चर्चा होत असून त्यावर साधक बाधक प्रतिक्रिया येत आहेत.पंढरपूरची निवडणूक हाय व्होल्टेज ठरत असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोघातच कांटे की टक्कर दिसून येत आहे.

राष्ट्रवादीतर्फे जवळजवळ सर्वच प्रमुख नेत्यांनी इथे सभा घेत भगीरथ भालकेंना निवडून आणण्यासाठी जंग पछाडल आहे.त्यातच अजित पवारांनी कल्याणराव काळेंसारखा मोहरा स्वताकडे वळवला आहे.मनसेचाही पाठिंबा मिळवला आहे.अजितदादा फडणवीसांच्या या वक्तव्यावर सभेत बोलताना म्हणाले,आमदार आणि मंत्री पक्ष सोडून जाऊ नयेत म्हणून फडणवीस अशाप्रकारची विधान करत असतात.त्याला आम्ही किमंत देत नाही.आमच सरकार स्थिर असून पाच वर्ष घोडदौड करणार आहे.अजितदादांनी स्वता या निवडणुकीत वैयक्तिक लक्ष घातल आहे.

दरम्यान जयंत पाटीलांनी फडणवीसांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आणि फडणवीसांच्या कानपिचक्या घेतल्या.ते म्हणाले “पाच वर्ष सत्तेत राहायला हिम्मत लागते ती आम्ही ठेवतो.”फडणवीसांनी दिशाभूल करू नये.स्वता देवेंद्र फडणवीसच पाच वर्ष विरोधी पक्ष नेते राहणार नाहीत अस मी मानतो.राष्ट्रवादी काँग्रेसन आतापर्यंत नेहमीच सत्ता समीकरणात मित्रपक्षाला नैतिकतेन पाठिंबा दिला आहे.राष्ट्रवादी आताही त्यांच्याकडे आलेली जबाबदारी पार पाडत असून सत्ता टिकवण्यासाठी खंबीर आहे असही ते म्हणाले.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.