‘काहींनी दूध घेतल्यावर नाही तेच सुरू होत’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीवर एकच हशा!

0

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे कामाच्या बाबतीत फारच जागरूक असतात सकाळी भल्या पहाटे जनतेच्या कामकाजाने त्यांच्या दिवसाची सुरुवात होते. फक्त सत्ताधारी पक्षातील नावे तर विरोधी पक्षातील सुद्धा लोक मोठ्या संख्येने अजित पवारांकडे काम घेऊन जात असतात आणि याच विश्वासाने ते पूर्ण करतात.

अजित पवार हे कधी कधी सकाळीच अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसून येतात. सकाळी सात वाजण्यापूर्वीच अजित पवार हे पुण्यातील बाणेर परिसरात असलेल्या कोविड रुग्णालयाला भेट देण्यासाठी दाखल झाले. विविध विकास कामांच्या पाहणी करण्यासाठी सकाळपासूनच अजित पवारांचा दौरा सुरू झाला. अशा कामाच्या व्यापात सुध्दा अजित पवार हे मिश्किल टिप्पणी करत असतात.

अजित दादा पवार यांनी सकाळी पाच मजली कोविड हॉस्पिटलच्या इमारतीची पाहणी केली. इमारती मधील तळ मजल्यावर चर्चा सुरू असताना सर्वांसमोर चहा, बिस्किट आदी नाश्त्याचे पदार्थ ठेवण्यात आले. सोबतच दुधाचे ग्लास देखील ठेवण्यात आले. तेवढ्यात अजित पवारांनी दूध घेण्यास सुरुवात केली. काही जण दूध घेत नसल्याचं पाहून अजित पवार म्हणाले, काहींनी दूध घेतल्यावर नाही तेच सुरू होत, असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

दादा पुढे म्हणाले की मला आणि आयुक्तांना सवय आहे म्हणून दूध घेतो. काहीजण दुधाच्या ग्लासाला हात लावायला तयार नाहीत. त्यामुळे काहींना दुधाची अ‍ॅलर्जी पण असते किंवा काही जण पीत देखील नाहीत असे अजित पवार म्हणाले. अजित पवार यांचा स्वभाव फारच मिश्किल असा आहे जितके ते कठोर दिसतात तितकेच ते हळवे आणि प्रसंगावधान राखत टोला मारणारे नेते म्हणून प्रसिद्ध आहेत.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.