घरात बसून कुठल्याही महत्वकांक्षा व्यक्त करणे योग्य नाही – जयंत पाटील

0

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुलाखती मध्ये बहुतांश गोष्टींचा बेधडक उत्तर देत उलगडा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधानसभा निवडणुकीच्या पर्यंत अधिक सक्षम होईल असे ते म्हणाले.

मुख्यमंत्रिपदाबाबत प्रश्न विचारण्यात आला. कोणत्याही राजकीय पक्षाला मुख्यमंत्रिपदासारखं सर्वोच्च पदाची आस्था असणं साहजिक आहे. २०२४ मध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा अशी तुमच्या पक्षाची महत्वकांक्षा नाही का? असे जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की “घरात बसून कुठल्याही महत्वकांक्षा व्यक्त करणे योग्य नाही, जे पक्ष अधिक चांगला झाला, जनतेने साथ दिली तर त्या त्या वेळी योग्य निर्णय शरद पवार घेतील. आज पहिलं काम आहे पक्ष बलवान करणे. महाराष्ट्रातील नागरिकांना जे प्रश्न भेडसावत आहेत, ते सोडवणे, लोकांचं जीवनमान सुधारणं हे आमच्या पक्षाचं ध्येय आहे” असे त्यांनी सांगितले. स्पष्ट भूमिका घेण्याच्या बाबतीत जयंत पाटील प्रसिद्ध आहेत.

जयंत पाटील यांचा मुस्तद्दी स्वभाव सर्वश्रुत आहे. टप्प्यात कार्यक्रम हा त्यांचा स्वभाव आणि डायलॉग प्रसिद्ध आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.