
“खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजपा नेत्यांची जुनी सवय” ; रोहीत पवारांची फडणवीसांवर टीका
देवेंद्र फडवणीस यांना बहुतांश वेळा चांगलेच तोंडघशी पडावे लागत आहे. कारण सातत्याने देवेंद्र फडवणीस खोटे बोलताना आढळून येत आहेत. पुरावे देत देवेंद्र फडणवीस कशाप्रकारे खोटं जनतेला बोलत आहेत आणि दिशाभूल करत आहेत हे सातत्याने मांडले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ. रोहित पवार यांनी फडणवीस यांच्यावरती टीका करत त्यांचा खोटारडेपणा उघड केला आहे.
आ.रोहित पवार म्हणाले की “खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही भाजप नेत्यांची जुनी सवयच आहे. पेट्रोलवर लावण्यात येणाऱ्या करातले १२ रुपये राज्यांना मिळतात असं हास्यास्पद विधान भाजपकडून पुण्यात करण्यात आलं. देशात इतर कुठंही ही चलाखी चालून गेली असती पण महाराष्ट्रात नाही”. असे ते म्हणाले.
आ. रोहित पवार पुढे म्हणतात की “केंद्र सरकार आकारत असलेल्या पेट्रोल वरील करात राज्याला किती पैसे मिळतात? तर केंद्र सरकार पेट्रोलवर आकारत असलेल्या ३२.९० रु पैकी महाराष्ट्राला केवळ साडे तीन पैसे मिळतात. तरी केंद्र सरकारचे अपयश लपवण्यासाठी आपण मात्र राज्याला १२ रु मिळत असल्याचे सांगतात. विरोधकांना साडेतीन पैशाच्या ठिकाणी १२ रु दिसत असतील तर याला काय म्हणावं? सगळीकडं अधिवेशनातील बाराचाच आकडा दिसत असेल तर त्याला इलाज नाही. दिवसाढवळ्या जेष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत असं धडधडीत खोटं बोलणं कुठल्याही नेतृत्वाला शोभणारं नाही”. आशा प्रकारे त्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या खोटारडेपणा वरती आक्रमक होत आ. रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे.