इस्राईल पहिला कोरोनामुक्त देश

0

इस्राईल सारखा चिमुकला देश सातत्यान त्याच्या विविध उपक्रमामुळ चर्चेत असतो.सॉईल लेस शेती असो की,तेल अविवमधील संपूर्ण वायफाय कनेक्शन सुविधा असो इस्राईलने आर्थिक प्रगतीची कांस धरलेली आहे.इस्राईल हा चिमुकला देश सातत्यान अभिनव कल्पना राबवत असतो.बहुसंख्य ज्यू असणारा हा देश सामाजिक नियम पाळण्यातही अग्रेसर आहे.

इस्राईलची गुप्तचर संस्था मोसाद जगदविख्यात असून सातत्यान चर्चेत असते.सध्याही इस्राईल चर्चेत असून कौतुकास्पद अशी कामगिरी त्यांनी केलेली आहे.सगळ्या जगाबरोबरच कोरानामुळे तिथेही सर्वच स्तरावर घडी घसरली होती परंतु इस्राईलची लोकसंख्या अतिशय कमी आहे.त्यांनी तात्कालिक पावल उचलत कोरोना परिस्थितीवर नियंत्रण मिळवल.लोक उत्स्फूर्तपणे कोरोना नियम पाळून सरकारला साथ देत होती.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये इस्राईलमध्ये लसीकरण सुरू झाले त्याचा परिणाम दिसून येत असून सध्या इस्राईल पहिला कोरोनामुक्त देश ठरला आहे.इस्राईलची लोकसंख्या ९.३दशलक्ष आहे.पैकी ८लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोना लागण झाली तर ६ हजारपेक्षा जास्त लोकांचा कोरोनान मृत्यू झाला.परंतु यावर्षी मात्र इस्राईलने जोरदार लसीकरण केले त्यात अनेकांनी फायजर व तत्सम लसी घेतल्या.देश कोरोना मुक्त ठरल्यान कोरोना नियम मागे घेत सरकारन मास्क सक्ती उठवली असून रविवारपासून सर्व शाळा सुरू झाल्या आहेत.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.