
पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत निवडणुकांत बीझी? युवक काँग्रेस सत्यजीत तांबेंची मिश्कीली
देशात सध्या पाघ राज्यांच्या निवडणुका टप्प्या दर टप्प्यान पार पडत असून बंगाल,तामिळनाडू या राज्यातील मतदान पूर्ण झाल आहे.भाजपतर्फे या निवडणुकात अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे.पंतप्रधान मोदी भाजपचे स्टार प्रचारक असल्यान राज्यातील या महत्वपूर्ण निवडणुकांसाठी ते सभा घेत फिरत आहेत.त्यांच्या प्रचार धडाक्यावर काँग्रेसन टिका सुरू केली असून पंतप्रधानांना देशातील जनतेच्या प्राणांपेक्षा निवडणुका महत्वाच्या आहेत.अशी टिका सर्वच नेत्यांनी सुरू केली आहे.
युवक काँग्रेसचे सत्यजित तांबे यांनीही अशाचप्रकारची टिका एका काल्पनिक मिश्कीलीद्वारे केली आहे.सत्यजित तांबे यांच एक ट्विट सध्या व्हायरल होत असून त्यात सत्यजित तांबेंनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा काल्पनिक फोन संवाद पंतप्रधान कार्यालयाशी करवला आहे.या फोनमध्ये उध्दव ठाकरे पंप्रधान मोदींशी रेमेडिसेव्हर आणि आॅक्सिजनबाबत बोलायच आहे अस सांगतात तर पंतप्रधान कार्यालयातून उत्तर येत पंतप्रधान मोदी सध्या निवडणुकात व्यस्त असून २ मेनंतर फोन करा.
सत्यजित तांबे या मिश्किलीतून पंतप्रधान मोदी यांच्यावर टिका करत असून पंतप्रधानांनी देशातील कोविड स्थिती हाताळावी अशी मागणी करत आहेत.दरम्यान देशात पार पडत असलेल्या कुंभ मेळ्यात मोठ्या संख्येन कोरोनाचा फैलाव झाला असून अनेकजण मृत्युमुखी पडले आहेत.