
‘कुत्रे सोडल्यासारख्या तपास यंत्रणा अंगावर सोडल्या जात आहेत’, काँग्रेसचा मोदी सरकारवर निशाणा
भारतीय जनता पक्षाकडून सातत्याने देशातील महत्त्वपूर्ण अशा तपास यंत्रणांचा राजकीय सूडबुद्धीने वापर करण्यात येत आहे. विरोधी पक्ष आवर्ती सातत्याने दबाव ठेवण्यासाठी या तपास यंत्रणेकडून नेत्यांना चौकशी लावून त्रास देण्यात येत आहे अशी राजकीय वर्तुळामध्ये सातत्याने चर्चा सुरू असते यावर काँग्रेस पक्षाने मोदी सरकार वर चांगलाच निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. तर भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे यांच्या कुटुंबीयांचीही ईडीकडून चौकशी करण्यात येते आहे. सोबतच शिवसेनेचे नेते तथा अनिल परब यांच्यावरही कारवाईची टांगती तलवार कायम आहे. मात्र भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेले कित्येक नेते पवित्र झाल्याचे पाहायला मिळाले आहे. याच भाजपच्या सूडबुद्धी वरती सातत्याने विरोधकांकडून आरोप केले जात आहेत
काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ‘कुत्रे सोडल्यासारख्या तपास यंत्रणा अंगावर सोडल्या जात आहेत’ अशी टीका चव्हाण यांनी केली. पुणे येथील पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी असे विधान केले आहे सोबतच ते म्हणाले की ‘दोषी ठरल्यावर कारवाई करा. आधीच्या काळात असे होत नव्हते. खडसे यांनी पक्ष बदलल्यावर त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. पण दुसऱ्या कुण्या नेत्याला प्रवेश दिला की भाजपात धुतल्या तांदळासारखे होते,, आणि नंतर काय झालं? असा सवालही चव्हाण यांनी विचारला आहे.