पाकिस्तानला लसींचा पुरवठा करण्यापेक्षा, केंद्राने त्या आधी महाराष्ट्राला द्याव्यात

0

मुंबई : करोना प्रतिबंधात्मक लसींच्या राज्याला होणाऱ्या पुरवठ्यावरुन, सध्या केंद्र आणि राज्यामध्ये राजकारण चांगलंच तापलं आहे. अशातच राज्यात करोना प्रतिबधांत्मक लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने, राज्यभरात अनेक ठिकाणी लसीकरण केंद्र बंद करण्याची नामुष्की सरकारवर आली. यावरून सध्या राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात खडाजंगी सुरु आहे.

दुसरीकडे भारत हा जगभारतील अनेक देशांना मोठ्या संख्येने लसी निर्यात करत असून, शेजारील देश आणि देशाचा पारंपारिक शत्रू समजल्या जाणाऱ्या पाकिस्तानला देखील, माणुसकीच्या नात्याने आपण, या मोठ्या संकटाच्या काळात सहकार्य करत आहोत.

दरम्यान, या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठं विधान केलं आहे. “राज्यात करोनाची स्थिती अतिशय गंभीर होत चालली आहे. देशातील ५०% करोना बाधित रुग्ण एकट्या महाराष्ट्रात सापडत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने पाकिस्तानला लस पुरवण्यापेक्षा आधी महाराष्ट्राला लस द्याव्यात”, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

तसेच त्यांनी, केंद्राकडून राज्य सरकारला केल्या होणारा लसींच्या पुरवठ्याचा वेग अतिशय संथ असल्याचे सांगत, केंद्राकडून जाणून बुजून केल्या जाणाऱ्या दुजाभावामुळेच राज्यातील जनतेचे हाल होत असल्याची टीका केली आहे.

दरम्यान, राज्याच्या बिकट करोना परिस्थितीवरून आज मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली असून, करोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.