हर्षवर्धन यांचा राजीनामा घेण्याऐवजी मोदींनीच राजीनामा द्यायला हवा; नाना पटोले यांचा घणाघात

0

केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. यामध्ये काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे तर काही दिग्गज चेहऱ्यांना राजीनामे द्यावे लागले आहेत. याच मुद्द्यावरून महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भारतीय जनता पक्षावर चांगलीच टीकेची झोड उठवली आहे.

नाना पटोले म्हणाले की “डॉ. हर्षवर्धन यांचा केंद्रीय आरोग्य मंत्रीपदाचा राजीनामा घेण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच राजीनामा द्यायला हवा होता. मोदीच सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहेत, असा घणाघाती हल्ला नाना पटोले यांनी चढवला आहे.

देशभरातील महागाईविरोधात महाराष्ट्रातील काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे काँग्रेसकडून दहा दिवस आंदोलन करण्यात येणार आहे आंदोलनाच्या पहिल्या दिवशी नाना पटोले यांनी सायकल रॅली काढली या सायकल रॅलीमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत केंद्र सरकार वरती टीका केली यावेळी नाना पटोले म्हणाले “मोदींच्या मंत्री मंडळातून चांगल्या मंत्र्यांना, काम करणाऱ्या मंत्र्यांना डच्चू मिळाला आहे. भ्रष्ट मंत्र्यांना प्रमोशन देण्यात आलं आहे. संजय धोत्रे हे चांगलं काम करत होते. त्यांनाही मंत्रिमंडळातून काढलं आहे. देशाला बरबाद करणाऱ्यांना ठेवलं आहे. ज्यांनी पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करणार नाही, असं सांगणाऱ्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात ठेवलं आहे, असं सांगतानाच कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी अपयशी ठरले आहेत. कोरोनामुळे देशात अनेकांचे जीव गेले. हा मोदींच्या ढिसाळ कारभारामुळेच हे घडलं आहे. त्यामुळे हर्षवर्धन यांचा राजीनामा घेण्याऐवजी मोदींनीच राजीनामा द्यायला हवा होता”, असं पटोले म्हणाले.

केंद्र सरकार वरती नाना पटोले यांनी चांगलीच टीका केली आहे. महाराष्ट्र भरा मधून काँग्रेस पक्षाकडून महागाईविरोधात आंदोलन करण्यात येत आहे महाराष्ट्र काँग्रेस सध्या चांगलीच ॲक्टिव्ह झाली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.