आजादीचे महानायक चंद्रशेखर आझाद यांच्या आयुष्याबद्दलची ‘ही’ माहिती तुम्हाला विचलित करू शकते..

असे स्वातंत्र्यसैनिक जे जिवंतपणी कधी इंग्रजांच्या हाती सापडले नाहीत ,चंद्रशेखर आझाद यांची ही आहे पराक्रम गाथा !

0

भारताला वीर – जवानांची परंपरा आहे. अनेक स्वातंत्र्य सेनानी यांनी आपल्या जीवाची आहूती दिलेली आहे आणि भारतभूमीला, या आपल्या मातृभूमीला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जिवाचे रान देखील केले आहे. भारत स्वतंत्र होण्यापूर्वी अनेक क्रांतिकारक आपल्या सर्वांना माहिती आहे. या क्रांतिकारकांनी स्वतःच्या जीवाची घराचे पर्वा न करता आपले सारे जीवन भारत माताच्या चरणी अर्पण केले होते. भारतमातेला स्वतंत्र करण्यासाठी जीवाचे रान केले होते. इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी अनेकांनी आपले सारे जीवन व्यर्थ केलेले आहे. बलिदान दिलेला आहे. या बलिदानाला आज देखील आपण आठवत असतो. या महापुरुषांनी केलेल्या बलिदानाबद्दल तसे पाहायला गेले तर शब्द अपुरे आहेत. एक वेळ असा होता की आपली भारत माता इंग्रजांच्या शृंखला मध्ये अडकलेली होती. इंग्रजांपासून भारतभूमीला वाचवण्यासाठी व इंग्रजांच्या राज्यातून भारताला मुक्ती मिळवण्यासाठी अनेक महापुरुषांनी प्रयत्न केले आहेत , आजच्या या लेखामध्ये आपण अशाच एका महापुरुषाबद्दल जाणून घेणार आहोत यांनी आपल्या भारत भूमीच्या प्रेमामुळे इंग्रजांच्या नाकीनऊ आणले होते. इंग्रजांना सळो की पळो करून ठेवले होते, अशा या स्वातंत्र्य सेनानी यांचे नाव आहे चंद्रशेखर आजाद. चंद्रशेखर आझाद यांनी जोपर्यंत जीवंत होते.

प्राणामध्ये प्राण होते तोपर्यंत इंग्रजांविरुद्ध लढले. इंग्रजांना चंद्रशेखर आझाद कधीच जिवंतपणी सापडले नाही. चंद्रशेखर आझाद यांनी आपले सारे जीवन भारत मातेसाठी अर्पण केले होते परंतु या गोष्टीचा कधीच त्यांनी देखावा केला नाही. आपल्या सर्वांना एक गोष्ट जाणून हैंराणी होईल की चंद्रशेखर आझाद यांनी कधीच आपल्या अख्ख्या जीवना मध्ये आपला फोटो कधी काढला नाही. आयुष्यभर फोटो न काढण्यामागे त्यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यांचे म्हणणे असे होते की, जर त्यांचा फोटो वर्तमानपत्रांमध्ये छापून आला तर त्यांचे स्वप्न अपूर्ण राहील म्हणजेच चंद्रशेखर आझाद यांचे असे स्वप्न होते की लवकरात लवकर भारत माता कशी इंग्रजांच्या तावडीतून मुक्त होईल म्हणून त्यांनी कधीच स्वतःचा फोटो काढला नाही. हल्ली आपण सगळीकडे जो चंद्रशेखर आझाद यांचा फोटो पाहतो तो फक्त एक चित्र आहे. ते चित्र त्यांचे मित्र रुद्र नारायण यांनी लपून हा फोटो काढला होता. परंतु एका गद्दारांनी थोड्या पैशांच्या लालसेपोटी हा फोटो प्रकाशित करून या क्रांतिकारी सेनानीला पकडून दिले होते. आजच्या लेखामध्ये आपण चंद्रशेखर आझाद यांच्या बद्दल महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत त्याच बरोबर जिवंतपणी असताना व शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी इंग्रजांसोबत कशाप्रकारे सडेतोड उत्तर दिले याबद्दल जी महत्त्वाची माहिती देखील आज आपण जाणून घेणार आहोत. 23 जुलै 1906 रोजी मध्य प्रदेश येथील भावरा गावी एका लहान मुलाचा जन्म झाला आणि या लहान मुलाचे नामकरण चंद्र शेखर तिवारी ठेवण्यात आले.

चंद्रशेखर तिवारी लहानपणापासूनच अभ्यासामध्ये हुशार होते. अभ्यासामध्ये हुशार असताना त्यांनी तिरंदाजी म्हणजेच नेमबाजीचे देखील शिक्षण घेतले आणि ही कला त्यांना अवगत होती. शरीराने मजबूत आणि पिळदार शरीरयष्टी असल्याने त्यांचे व्यक्तिमत्व चारचौघांमध्ये उलटून दिसायचे परंतु गावांमध्ये राहून इतर व्यक्ती प्रमाणेच लक्ष हिन जीवन जगणे हे त्यांच्या मनाला काही पटत नव्हते. असेच एके दिवशी चंद्रशेखर तिवारी यांनी आपल्या गावावरून मुंबई गाठली. मुंबईला आल्यानंतर बंदरावर जहाजांना रंग काम करण्याचे कार्य ते करू लागले परंतु काही दिवस हे काम केल्यानंतर त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्‍न निर्माण होऊ लागले. जर पोटातच विचार करायचा होता तर गाव का सोडले? असे अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये येत असे आणि एके दिवशी ते बंगालला निघून गेले. बंगाल ला गेल्यावर त्यांनी संस्कृतचे शिक्षण घेतले. संस्कृत शिक्षण घेत असतानाच इंग्रजांवर चे होणारे अत्याचार याबाबतच्या बातम्या त्यांच्या कानावर पडत असे.या अत्याचाराच्या बातम्या ऐकून त्यांचे रक्त खवळून जायचे. इंग्रजांच्या अत्याचाराचा  सर्वसामान्य नागरिकांवर मोठ्या प्रमाणावर त्रास होत असे. चंद्रशेखर आझाद यांचे क्रांती विचारी असणारे अनेक सहकारी त्यांच्या शाळेमध्ये देखील होते आणि एके दिवशी म्हणजेच 1919 ला यांनी केलेल्या जालियनवाला बाग हत्याकांड यामुळे चंद्रशेखर आझाद यांना खूपच दुःख झाले. चंद्रशेखर हे जरी संस्कृत शाळेमध्ये शिक्षण घेत असले तरी इंग्रजांचा होणारा अत्याचार यामुळे त्यांचे मन विव्हळत असे. इंग्रजांविरुद्धच्या त्यांच्या मनामध्ये आग पेटली होती.

1920 मध्ये महात्मा गांधी यांनी असहकार चळवळ ने मध्ये मोठा जोर धरलेला होता आणि याच नेमके हेच निमित्त साधून चंद्रशेखर आझाद यांनी सुद्धा महात्मा गांधी यांच्या असहकार चळवळ मध्ये सहभाग घेतला. या असहकार चळवळीचा एक भाग म्हणून चंद्रशेखर यांनी कॉलेजमध्ये आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाची खबर इंग्रज सरकारला लागली होती आणि त्यानंतर केंद्र सरकारने कॉलेजमध्ये आल्यावर जे काही आंदोलन करत होते त्यांना कैद केले आणि काहीच केल्यानंतर कारावासाची शिक्षा देखील सुनावली. या आंदोलनामध्ये चंद्रशेखर यांच्यासोबत जे काही सहकारी मंडळी होती ती वयापेक्षा खूपच मोठी होती. इंग्रजी द्वारे अटक केल्यानंतर चंद्रशेखर यांना त्यांचे नाव व वडिलांचे नाव विचारण्यात आले तेव्हा त्यांनी सांगितले की, माझे नाव आझाद आहे आणि माझ्या वडिलांचे नाव स्वतंत्र आहे. या दिवसापासून त्यांचे नाव चंद्रशेखर आझाद पडले.या आंदोलनाच्या वेळी चंद्रशेखर यांचे वय फक्त 14 वर्षे होते म्हणून चंद्रशेखर यांना पुढची शिक्षा सुनावण्यात आली नव्हती. फक्त काही फटके देऊन त्यांना सोडण्यात आले होते. परंतु या फटकांचा मार खूपच भयंकर होता. एका फटक्याने संपूर्ण शरीर ढवळून जात होते परंतु स्वातंत्र्याच्या भुकेपोटी हे सारे फटके क्षीण होते. चंद्रशेखर आझाद यांना फक्त आपली भारत माता कशा पद्धतीने आझाद होईल याचे स्वप्न ठरलेले होते. प्रत्येक फटका खात असताना त्यांच्या मुखातून वंदेमातरम या नावाचा जयघोष होत असे. पूर्ण आयुष्यामध्ये फक्त एकदाच चंद्रशेखर आझाद इंग्रजांच्या हाती आले त्यानंतर पुन्हा कधीच चंद्रशेखर आझाद यांच्या हाती आले नाही. काही दिवसानंतर चंद्रशेखर आझाद रिपब्लिकन असोसिएशनमध्ये त्यांनी सहभाग घेतला. ही एक क्रांतिकारी लोकांची संघटना होती. या संघटनांमध्ये क्रांतीच्या कारक विचारांची लोक सहभागी होती. या काळामध्ये चंद्रशेखर यांची आर्थिक परिस्थिती इतकी चांगली देखील नव्हती परंतु या सर्व परिस्थितीत पुढे त्यांना देशाची काळजी लागलेले होते आणि असेच एके दिवशी 1925 रोजी त्यांनी एक इंग्रजांविरुद्ध पाहून उचलण्याचा कार्यक्रम केला त्याच बरोबर एका ट्रेनमधील खजिना लुटण्याचा प्लॅन देखील आखला. प्रत्येक सहकार्‍याच्या योग्य ते काम देण्यात आले होते आणि या प्लॅननुसार अस ट्रेनमधील खजिना लुटण्याचा कार्यक्रम आखण्यात आला होता प्रत्येक सहकाऱ्यांनी दिलेली ड्युटी आणि कर्तव्य व्यवस्थितरित्या पार पाडले. गार्ड आणि मोटरमन यांना जमिनीवर पाडणे,या साऱ्या गोष्टी करून खजिना लुटण्यात आला परंतु खजिना लुटताना खजिना पेटारा यापेक्षा खूपच जड होता अशा वेळी पेटारे हातोडीने तोडून त्यातील खजिना बाहेर काढण्यात आला. अशाप्रकारे सर्व खजिना इंग्रजांचा लुटण्यात आला होता. काकोरी या चोरी लुटेरे प्रकरणांमध्ये चंद्रशेखर आझाद यांना सोडून सगळे सहकारी पकडले गेले होते. या झालेल्या लूट मुळे इंग्रज सरका जागे झाले होते आणि त्यानंतर सगळीकडे क्रांतिकारीना शोधण्यासाठी धडपड होऊ लागली. सगळीकडे क्रांतिकारकांचा शोध घेण्यात येऊ लागला.

गुप्तचर विभाग डोळ्यामध्ये तेल टाकून सगळीकडे पाहत असे त्याचबरोबर क्रांतिकारक असल्याचा त्यांना यांना संशय येत असे त्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी मोठ्या प्रमाणात होत असे. सत्तेचाळीस दिवसानंतर उत्तर प्रदेश मधील एका ठिकाणी छापा टाकण्यात आला आणि तेथे उपलब्ध असणारे क्रांतिकारकांना शिक्षा देण्यात आले. काहींना फाशीची शिक्षा देण्यात आली तर काहींना जन्मठेपेची शिक्षा देखील सुनावण्यात आली. फक्त चंद्रशेखर आणि कुंदनलाल हे दोनच जण पोलिसांच्या हाती सापडले नव्हते. बाकीच्यांना मोठ्या प्रमाणावर आणि भयानक शिक्षा देण्यात आली होती. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे चंद्रशेखर आझाद यांना कधीच इंग्रजी पोलीस अधिकारी जिवंत पकडू शकले नाही. 1928 का भगत सिंह यांना अटक होण्यापासून चंद्रशेखर  यांनी वाचवले होते. खरतर 1928 मध्ये भगतसिंग याने इंग्रज अधिकारी सँडर्स याच्या वर गोळ्या झाडल्या होत्या. घटना घडत असते वेळी अनेक इंग्रज अधिकारी उपस्थित होते परंतु भगतसिंग व राजगुरू यांनी कॉलेज मार्गाने पळण्याचा प्रयत्न केला. या दोघांच्या मागे चरण सिंह व अन्य पोलिस अधिकारी वेगाने मागे पाहिले होते हॉस्टेलच्या खिडकीमधून हा सर्व प्रकार चंद्रशेखर आझाद पाहत होते आणि चंद्रशेखर यांना हे सुद्धा कळून चुकले होते की भगतसिंग व राजगुरू यांच्याकडे असलेल्या पिस्तूलमधील गोळ्या देखील संपलेल्या आहेत. त्यानंतर चंद्रशेखर यांनी चरणसिह पोलिस अधिकाऱ्याच्या मांडीवर गोळ्या झाडल्या तो तिथे जखमी अवस्थेत पडला आणि कालांतराने त्याचा मृत्यू देखील झाला आणि त्यानंतर भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर यांनी तेथून पळ काढला.आपल्या अधिकाऱ्यांना क्रांतिकारी ने मारले हे इंग्रज सरकारच्या पोलीस विभागाला सहजच पचन न होणारे होते.

भगतसिंग चंद्रशेखर आणि राजगुरू या तिघांनी इंग्रज सरकार पासून पिच्छा सोडवण्यासाठी वेगळ्या प्रयत्नदेखील केले परंतु इंग्रज सरकारचे सगळे प्रयत्न अयशस्वी ठरले. या तिघांना पकडण्यासाठी ब्रिटिश सरकार वेगवेगळ्या युक्ती लढवत होत्या त्याचबरोबर एके दिवशी भगतसिंग यांनी संसदेमध्ये बॉम्ब हल्ला केल्यानंतर भगतसिंग यांनी स्वतःला इंग्रजाच्या हवाली केले, परंतु ही घडलेली घटना चंद्रशेखर आझाद यांना अजिबात आवडली नव्हती.भगतसिंग यांना सोडवण्यासाठी चंद्रशेखर आझाद यांनी पंडित नेहरू यांची भेट देखील घेतली होती. 27 फेब्रुवारी 1931 व चंद्रशेखर आझाद यांनी पंडित नेहरू यांची भेट घेतली होती. भेट घेतल्यानंतर चंद्रशेखर आझाद यांनी पंडित नेहरू यांना विचारले की, स्वातंत्र्य देश झाल्यानंतर देखील यांच्यावर खटले चालू राहतील का? तर अशावेळी पंडित नेहरू यांनी होय, काही प्रमाणात घटले चालू राहतील त्यानंतर भेट घेतल्यानंतर वर चंद्रशेखर आझाद अल्फ्रेड मैदानात आले आणि तेथील सहकार्‍यांसोबत देखील चर्चा करू लागले परंतु एक गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे ज्या ज्या सहकाऱ्यांना चंद्रशेखर आजाद ओळखत होते अशा सर्व सहकाऱ्यांना इंग्रजांनी हळूहळू अटक करण्याचा प्रयत्न केला होता. एके दिवशी एका पार्क मध्ये बसलेले असतानाच इंग्रजांची गाडी उभी होती आणि अशा वेळी चंद्रशेखर यांच्यासोबत सुखदेव देखील उपस्थित होते.सुखदेव यांना पार्कमधून व्यवस्थित बाहेर काढण्याचा प्रकार मद्ये यश आले होते परंतु चंद्रशेखर यांनी गाडीतून उतरलेल्या एका गोऱ्या अधिकाऱ्यावर बंदुकीची गोळी चा वर्षाव केला. त्यानंतर दोन्ही बाजूने बंदुकीचा वर्षाव होऊ लागला. या पद्धतीच्या वर्षांव मध्ये एक घटना घडली ती म्हणजे चंद्रशेखर यांच्या मांडीला गोळी लागली आणि त्यांना कळून चुकले कीइंग्रजांचा ताफा आपल्याकडून थांबवता येणार नाही. याची कल्पना त्यांना आली आणि त्यांनी “भारत माता” चा जयघोष करत, “वंदे मातरम” म्हणत आपल्या मस्तकी बंदूक धरली आणि गोळी चालवली. अशाप्रकारे जिवंतपणी चंद्रशेखर आझाद कधीच इंग्रजांच्या हाती सापडले नाही परंतु त्यानंतर त्या ठिकाणी चंद्रशेखर आझाद यांनी स्वतःला गोळी झाली ते ठिकाण अनेकांसाठी प्रेरणा ठरले. अनेक लोक त्या झाडाखाली जात असे. ते झाड जांभळाचे होते त्या जांभळाच्या झाडाखाली अनेक लोक दिवा पणती प्रज्वलित करत असे आणि हे सर्व पाहून इंग्रज अधिकारी अजून चिडत असे म्हणून त्यांनी ते झाड रातोरात कापून टाकले आणि जमीन दोस्त केले अशा प्रकारे आपल्या जीवाची पर्वा न करता आपले सारे आयुष्य त्यांनी देशसेवेसाठी अर्पण केले होते आणि त्यानंतर भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांना इंग्रज सरकार द्वारे फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या महापुरुषांनी आपले सारे आयुष्य भारत मातेच्या सेवेसाठी अर्पण केले यांनी केलेल्या बलिदानामुळेच आपल्याला आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झालेले आहे आणि म्हणूनच या सगळ्या स्वतंत्र सैनिकांना नेहमी नमन करायला हवेत.

Leave A Reply

Your email address will not be published.