जनता विरुद्ध इंदिरा गांधी ; एकता कपूरने केली घोषणा…

0

अल्ट बालाजी या प्रॉडक्शन हाऊसने नेहमीच नवनवीन वेबसीरीज प्रेक्षकांसाठी आणून चाहत्यांचे मनोरंजन केले आहे.आता या प्रॉडक्शन हाऊसची नवी वेबसीरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही वेबसीरीज इंदिरा गांधीपासून प्रेरित असेल असं एकताने शेअर केलेल्या एका पोस्टवरुन वाटत आहे. एकताने याबाबदल इंस्टाग्राम वर माहिती दिली आहे.

एकताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, “ही वेळ आहे खटला २ची. जनता विरुद्ध इंदिरा गांधी. कौतुकास्पद त्याचबरोबर टीकेसही पात्र असलेली ही महिला. एक महत्त्वकांक्षी कथा.” यासोबतच तिने दोन पुस्तकांची मुखपृष्ठेही शेअर केली आहेत- ‘द केस दॅट शूक इंडिया’ आणि ‘इमर्जन्सी रिटोल्ड’. आणीबाणीच्या कालखंडातली ही गोष्ट असल्याचा अंदाज यावरुन लावता येईल.

 

अभिनेत्री कंगना रणौतने काही दिवसांपूर्वीच ती एका चित्रपटात इंदिरा गांधीची भूमिका करणार असल्याचं जाहीर केलं होतं. विद्या बालननेही सांगितलं होतं ही ती पूर्व पंतप्रधानांची भूमिका साकारणार आहे. मात्र, त्यानंतर त्यासंदर्भात कोणतीही गोष्ट समोर आली नाही. तर २०१७ साली प्रदर्शित झालेला मधुर भांडारकरचा ‘इंदू सरकार’ हा चित्रपट आणीबाणीवर आधारित होता. त्याच्यामुळे बरीच कॉन्ट्रोव्हर्सीही झाली होती.

२०१९ साली नानावटी प्रकऱणावर आधारित वेबसीरीज प्रदर्शित झाली होती. ‘द व्हर्डिक्ट- स्टेट व्हर्सेस नानावटी’ असं या सीरीजचं नाव असून यात मानव कौल, सुमीत व्यास, एली अवराम, अंगद बेदी आणि कुब्रा सईत हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये होते.

खटल्यांवर आधारित वेबसीरीजच्या मालिकेतील ही दुसरी वेबसीरीज ठरणार आहे. या वेबसीरीजबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. लवकरच हि वेबसीरीज प्रेक्षकांच्या भेटीला येवो अशी चाहत्यांनी समाज माध्यमांवर सदिच्छा व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.