
आज रंगणार थरार भारत-पाकिस्तान चा;पाकिस्तान च्या ह्या खेळाडूंची कामगिरी ठरू शकते विजयासाठी अडथळा..!
नुकताच T-20 विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे.यावेळी मात्र दररोज धक्का देणारे रोमांचक सामान्यांचा थरार बघायला मिळत आहे.खरंतर विश्वचषक चालू झाला पण त्यात रोमांच आणखी यायचा बाकी आहे,येणार तरी कसा कारण बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान सामना आज होणार आहे त्यामुळे आज मात्र ह्या स्पर्धेला एक वेगळाच रंग मिळणार आहे हे मात्र नक्की.
खरंतर पाकिस्तानने गेल्या काही वर्षांत टी-20 फॉरमॅटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे, ज्यामुळे पाकिस्तानचा संघ आयसीसी क्रमवारीत बराच काळ पहिल्या क्रमांकावर राहिला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम देखील या फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट टायमिंग आणि फॉर्ममध्ये दिसतोय.आयसीसी स्पर्धांमध्ये पाकिस्तानने भारताला 3 सामन्यांमध्ये पराभूत केले आहे.
हे तिन्ही सामने चॅम्पियन्स ट्रॉफीचे आहेत. ज्यामध्ये 2017 ची चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल आहे. या पराभवाने भारतीय चाहते प्रचंड निराश झाले होते. या सामन्यात भारताच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण म्हणजे नाणेफेक जिंकल्यानंतरही कर्णधार विराट कोहलीने प्रथम गोलंदाजी करण्याचा चुकीचा निर्णय घेतला होता.
भारताला या सामन्यात दोन स्पीड ब्रेकर्सचा सामना करावा लागणार आहे. त्यातला पहिला स्पीडब्रेकर म्हणजे कर्णधार विराट कोहलीचं महत्त्वाच्या प्रसंगी पॅनिक होणं आणि दुसरा स्पीडब्रेकर म्हणजे त्याचे असंयमी फैसले. आयपीएलपासून ते अनेक मोठ्या सामन्यांमध्ये भारतीय संघ व्यवस्थापन आणि विशेषतः कर्णधार कोहलीच्या चुका आपण पाहिल्या आहेत.
उदाहरणार्थ, 2019 विश्वचषक उपांत्य फेरीतील संघ निवडीसह एमएस धोनीच्या फलंदाजीचा क्रम बदलणे किंवा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला प्रथम फलंदाजी करण्याची संधी देणे. त्यामुळे समोरच्या संघाला स्वत:वरील दडपण दूर करण्याची पूर्ण संधी मिळाली.
आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की UAE हे पाकिस्तानसाठी घरच्या वातावरणात खेळण्यासारखे आहे.सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पाकिस्तानी खेळाडूंना यूएईमध्ये सर्वाधिक अनुभव आहे आणि भारताने चुकांची पुनरावृत्ती केल्यास या युवा संघाला भारतावर वर्चस्व मिळवण्यास वेळ लागणार नाही. तथापि, अलीकडेच भारताच्या खेळाडूंनी देखील यूएईमध्ये आयपीएलसाठी बराच वेळ घालवला आहे.खरंतर दिवाळी ला अजून वेळ आहे मात्र आजच्या सामन्यात भारत विजयी झाला तर नक्कीच भारतीयांसाठी हा दिवस दिवाळीपेक्षा गोड होईल हे मात्र नक्की..!