सांगलीत जैन समाजान उभारल भगवान महावीर कोविड हॉस्पिटल,पालक मंत्री जयंत पाटील यांनी केल उदघाटन

0

सांगली जिल्ह्यात जैन समाजान सेवेची परंपरा राखत दातृत्व कर्तव्य निभावत जैन समाज आणि राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्ट यांच्या पुढाकारान भगवान महावीर कोविड हॉस्पिटल अत्यंत कमी वेळेत उभारल आहे.जैन समाजाच्या या कृतीन कोविड रुग्णांना उत्तम उपचार मिळणार आहेत.जैन समाजाच्या या कृतीन भगवान महावीरांचे करुणामयी विचारांंचे संस्कार सर्वच समाजाला प्रेरणादायी ठरून माणुसकी वाढण्यास मदत होईल अशी आशा आहे.

सांगली येथील नेमिनाथ नगर येथे ७५ बेडच हे सुसज्ज हॉस्पिटल उभारल गेल असून सुरुवातीला ३५ बेड रुग्णसेवेत दाखल झाले आहेत.पैकी १५ बेड आयसीयु हायफ्लो नेझलयुक्त असतील तर २० बेड आॅक्सीजनयुक्त बेड असणार आहेत.हॉस्पिटलमध्ये तज्ञ डाॅक्टरांची टीम नेमलेली असून सौ.मुळे यांच्याकडून रुग्णांचे मानसिक समुपदेशन करण्यात येणार आहे.या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना शुध्द शाकाहारी भोजन मोफत मिळणार आहे.

पालक मंत्री जयंत पाटील यांनी या रुग्णालयाच उदघाटन केल असून जैन समाज तसेच राजमती पाटील ट्रस्टचे कौतुक केले आहे.जयंत पाटील यांनी या प्रसंगी हॉस्पिटलच्या विविध विभागात आपला वेळ तसेच सेवा दिलेल्या व्यक्तिंचा सत्कार करत त्यांना प्रोत्साहन दिल.जयंत पाटील यांनी डाॅक्टरांनाही प्रोत्साहित करत त्यांचा सत्कार केला.या हाॅस्पिटलमार्फत कोविड रुग्णांना उत्तम उपचार मिळतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली.दरम्यान या हॉस्पिटलसाठी समाजातील दानशुरांनी सढळ हस्ते मदत करत ७५ लाखाचा निधी दिला आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.