आयपीएलचे सामने होणार कोणत्या शहरात ?

0

आयपीएलचे चाहते आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंना स्थानिक टीमकडून खेळताना पाहण्यास उत्सुक असतात.एप्रिल,मेमध्ये आयपीएलची धूम असते.बच्चे कंपनीही आयपीएल आवडीने बघत असते.भारताच्या विविध शहरात खेळवण्यात येणारे हे सामने मागील वर्षी मात्र वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर युएईत भरवण्यात आले होते.परिणामी अनेक चाहत्यांची निराश झाली होती.कोरोना नियमानुसार गर्दी टळावी यासाठी प्रेक्षक मैदानात उपस्थित राहू शकत नाहीत,त्यामुळे प्रेक्षकांना हे सामने मैदानावर प्रत्यक्ष पाहण्याचा आनंद लुटता आला नाही.

यावर्षी 9 एप्रिलपासून हे सामने सुरू होत असून पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या दोन संघात होणार आहे.मुंबईतील कोरोना परिस्थिती पाहता हे सामने मुंबईसह देशातील इतर शहरात खेळवले जातील का?याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल आहे.परंतु या प्रश्नाच उत्तर सौरव गांगुलीन दिल असून आयपीएलच्या ठरलेल्या कार्यक्रमात कोणताही बदल होणार नसून सर्व सामने भारतातच पार पडणार आहेत अस त्यानी स्पष्ट केल.मुंबईत 10 एप्रिलपासून 25 एप्रिलपर्यंत आयपीएलचे 10 सामने खेळवण्यात येणार आहेत.त्यानंतर चेन्नई, दिल्ली,कोलकता,बंगळरू,अहमदाबाद येथे सामने पार पडणार आहेत.

सध्या महाराष्ट्रात विकेंड लाॅकडाऊन असून कर्फ्यू लावला आहे. परंतु आयपीएलवर याचा कोणताही परिणाम होणार नसून राज्य सरकारने या खेळाडूंना 8 नंतर सरावाची मुभा दिली आहे.आयपीएलमध्ये कोरोना दक्षता घेतली जात असून सर्व खेळाडू बायो बबलमध्ये आहेत.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.