पंढरपूर पोटनिवडणुकीत धनंजय मुंडे म्हणाले, “मी काय कच्च्या गुरुचा चेला नाही”.

0

पंढरपूर पोटनिवडणूक 17 तारखेला होणार असून त्यापूर्वी पंढरपूर,मंगळवेढा तालुक्यात सभांचा धडाका लागला आहे.सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची काल सभा झाली,सभेत धनंजय मुंडेंनी भाजपचा चांगलाच खरपूस समाचार घेतला.

ही निवडणूक बिनविरोध अपेक्षित होती.राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना ही निवडणूक लागायला नको पाहिजे होती असही त्यांनी सांगितल.

ते म्हणाले माझी पहिली सभा भारत भालके नाना यांच्या उपस्थितीत प्रचंड जनसमुदायासमोर पार पडली.नाना आणि माझ नात वडील,मुलाच होत.तेव्हापासून भाजपला सांगतोय कुणाचाही नाद करा पण पवार साहेबांचा नाद करू नका,पण त्यांना नाद करायची सवयच आहे.तुम्ही ती बंद करा आणि भाजपला इंगा दाखवा.

धनंजय मुंडेंची सभा चालू असतानाच नमाज सुरू झाली आणि धनंजय मुंडेंनी आपल भाषण नमाज पार पडेपर्यंत थांबवल,नमाज झाली व पुन्हा टोलेबाजी सुरू झाली.पंढरपुरात भगीरथच पाणी आणेल असही त्यांनी स्पष्ट केल.ते पुढे म्हणाले,मी आज भगीरथसाठी आशीर्वाद मागायला आलोय ते तुम्ही मताच्या रुपात देणार याची मला खात्री आहे.

धनंजय मुंडेंनी लक्ष्मण ढोबळे यांच्यावर टिका करताना मी काय कच्चा गुरुचा चेला नाही अस स्पष्ट केल.धनंजय मुंडेंच्या प्रत्येक वाक्यागणिक टाळ्या पडत होत्या व कार्यकर्त्यांचा जल्लोष वाढत होता.धनंंजय मुंढे पावसाबाबत म्हणाले,आमच्या नेत्यांनी पावसात सभा घेतल्या की भाजपला धडकी भरती.

दरम्यान धनंजय मुंढेंच्या मध्यंतरी गाजलेल्या दुसरी पत्नी प्रकरणावरून त्यांच्यावर लक्ष्मण ढोबळेंनी टीकेची झोड उठवली होती त्यालाही धनंजय मुंडेंनी प्रत्युत्तर दिल.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.