येत्या काळात युवा सेना गल्लोगल्ली पोहचली पाहिजे; आदित्य ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश!

0

आज आज युवासेना प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस आज वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांचे आयोजन कार्यकर्त्यांनी केले आहे तसेच डोंबिवली मध्ये कार्यकर्त्यांनी एक रुपया मध्ये एक लिटर पेट्रोल असा अनोखा उपक्रम सुद्धा त्यांनी राबवला आहे.

येत्या दोन वर्षांमध्ये युवासेना ही गल्लीगल्लीत पोहोचली पाहिजे, असे आदेश राज्याचे पर्यावरणमंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे  यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. शिवसेनेचा विस्तार हा अधिक झाला पाहिजे या उद्देशाने त्यांनी कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत. शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांनी रविवारी यासंदर्भात भाष्य केले.

आदित्य ठाकरे यांची शिवसेनेमध्ये व महाराष्ट्रामध्ये जबरदस्त क्रेझ आहे तरुण विचारांचं नेतृत्व म्हणून आज त्यांच्याकडे पाहिले जाते. नवनवीन संकल्पना मांडत असताना ते तरुणांच्या मनाला साद घालताना दिसताहेत.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.