शरद पवारांच्या आवाहनाला आ.अरुण लाड यांचा प्रतिसाद, सांगलीला २५ लाखांचे तीन व्हेंटिलेटर दिले.

0

कोरोनाच्या काळामध्ये रुग्णांची होणारी गैरसोय ही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली. ऑक्सिजन अभावी कित्येक रुग्णांना प्राण गमवावे लागले. ही गोष्ट लक्षात घेत पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण अण्णा लाड यांनी ही मदत जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण अण्णा लाड यांनी आपल्या निधीतून तीन व्हेंटिलेटरची मदत सांगली जिल्ह्याला केली आहे. तब्बल २५ लाख रुपये किंमतीची ही तीन व्हेंटिलेटर आहेत. हे व्हेंटिलेटर सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांच्याकडे देण्यात आले आहेत. यावेळी युवा नेते प्रतीक जयंतराव पाटील, आमदार अरुणअण्णा लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड हे उपस्थित होते.

तसेच त्यांनी ही परिस्थिती लक्षात घेत त्यांनी सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्याला व्हेंटिलेटरसाठी तब्बल एक कोटीं रुपयांचा निधी दिला. यातील पहिल्या टप्प्यातील ही मदत देण्यात आली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.