पंढरपूर पोटनिवडणुकीत कल्याणराव काळेंनी भाजपकडे फिरवली पाठ, पुन्हा करणार राष्ट्रवादीत प्रवेश

0

पंढरपूर निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केली असून अवताडेंना उमेदवारी जाहीर केली आहे.निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे.दरम्यान निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही त्यांचा उमेदवार उभा केला आहे.अत्यंत चुरशीच्या होणार्या या निवडणुकीत कल्याणराव काळे किंगमेकर ठरणार आहेत.कल्याणराव काळे यांच्या ताब्यात असलेले साखर कारखाने,बँक व संस्था यांमुळे कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा काळे यांच्या मागे डअसून पंढरपूर शहर व तालुक्यातील 22 गावात त्यांचा प्रबळ गट कार्यरत आहे.कल्याणराव काळे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता.मध्यंतरी कल्याणराव काळे पूर्णवेळ शेतीत लक्ष घालत होते.परंतु अलिप्त राहिलेल्या कल्याणराव काळेंना पुन्हा सक्रिय करण्याच काम राष्ट्रवादीन केलेल आहे.
कल्याणराव काळे पूर्वीपासूनच भारत भालके आणि विठ्ठल परिवार यांच्यासोबत होते.सध्या भारत भालके यांच्या मृत्युमुळेच पंढरपुरात पोटनिवडणूक लागली असून भारत भालकेंचे चिरंजीव भगीरथ भालके यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिलेली आहे.दरम्यान आज राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे काळे यांच्या फार्म हाऊसवर स्नेह भोजनासाठी जाणार असून कल्याणराव काळे यांनी त्यांना निमंत्रित केले आहे.दोन दिवसांपूर्वी कल्याणराव काळे देवेंद्र फडणवीसांना भेटले असून त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे.
भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने अजित पवार यांनीही जोरदार ताकद लावत भाजपचे मोहरे परत राष्ट्रवादीकडे वळवण्यात सुरुवात केली असून कल्याणराव काळेंनी राष्ट्रवादी आणि अजित पवार यांच्या मागे उभ राहण्याचा निर्णय घेतल्याने भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.