पंढरपूर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीन केल जीवाच रान पावसात भिजत जयंत पाटलांनी गाजवली सभा

0

पंढरपूर पोटनिवडणुकीत प्रचार टीपेला पोहोचला असून राष्ट्रवादीन जीवाच रान केल आहे.अजित दादा पवारांनीही सभा,बैठका घेत भगीरथ भालकेंच्या प्रचारासाठी विभाग पिंजून काढला आहे.कल्याणराव काळेनींही राष्ट्रवादीत प्रवेश करत पुन्हा पक्षाची मोट बांधली आहे.भाजपन ही निवडणूक प्रतिष्ठेची करत समाधान अवताडेंना उमेदवारी दिली आहे.ये

त्या काही दिवसात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस पंढरपुरात 6सभा घेणार आहेत.राज्यात लाॅकडाऊन सदृश्य परिस्थिती असताना राष्ट्रवादीन मात्र तु चाल गड्या अशी भूमिका घेत पंढरपुरात सभांचा धडाका लावला आहे.

राष्ट्रवादीत सध्या उत्साहाच वातावरण असून महाविकास आघाडी सरकार आल्यान राष्ट्रवादी सत्तेत असून अजित पवार उपमुख्यमंत्री पद भूषवत आहेत.नुकतच जळगाव व सांगली महापालिकेत राष्ट्रवादीन घवघवीत यश मिळवल आहे.

भाजपचा दोन्ही महापालिकेत पराभव झाला आहे.या सर्व पार्श्वभूमीवर भाजपन या निवडणुकीसाठी प्रयत्न लावले आहेत परंतु राष्ट्रवादीतील कसलेल्या नेत्यांनी मनसेलासुध्दा स्वताकड वळवण्यात यश मिळवल आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल मंगळवेढा तालुक्यातील सलगर बुद्रुक येथे सभा घेतली सभेदरम्यान विजेचा कडकडाट होत पाऊस सुरू झाला पण लोकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता,परिणामी जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांच्या मनाचा विचार करत आणि लोकांच्या भावना समजून घेत पावसात भीजतच भगीरथ भालकेंचा प्रचार केला आणि सभा गाजवली.

या सभेन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सातारच्या सभेची आठवण करून दिली ज्यात पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी भीजत सभा पार पाडली होती.नेत्यांच्या या कृतीमुळ कार्यकर्त्यात उत्साहाचा संचार झाला आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.