गर्दी टाळण्यासाठी एकनाथ शिंदेंची शक्कल फार न कापता वडवली पुलाच केल उदघाटन

0

 

मुंबई : मुंबईत सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून या रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी तसेच साथ पसरू नये यासाठी नवी नियमावली जाहीर झाली असून त्यात गर्दी टाळण्याचे आवाहन केलेले आहे.राज्यात एकीकडे कोरोना साथ पसरली असली तरी विकास कामांना कोणताही ब्रेक लागलेला नाही.असाच लोकांच्या सोईसाठी तसेच त्यांचा वेळ वाचवण्यासाठी अंबवली-शहाड रेल्वे स्थानकाच्या दरम्यान वठवली रेल्वे उड्डाण पूल बांधण्यात आला असून त्याचा वापर लोकांना लगेच करता यावा यासाठी त्याच उदघाटन करण गरजेच होत.

पुलाच उदघाटन पालक मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडणार होत परंतु कोरोनाची साथ पसरू नये यासाठी एकनाथ शिंदेंनी शक्कल लढवली व फित कापण्याचा औपचारिक कार्यक्रम टाळत पुलावरून स्वताची गाडी नेत उदघाटन झाल्याच जाहीर केल व पुलाचे लोकार्पण केले.परिणामी फित कापताना होणारी गर्दी टाळली गेली तसेच तासनतास ताटकाळायचा लोकांचा वेळ वाचला.एकनाथ शिंदेंच्या या शक्कल लढवण्याची सगळीकडे चर्चा होत असून त्यांचे कौतुकही होत आहे.वेळ प्रसंगानुरूप एकनाथ शिंदेंनी घेतलेली ही भूमिका खरच कौतुकास पात्र ठरली आहे.

या लोकार्पण सोहळ्यास शिवसेनेच्या व भाजपच्या विविध नेत्यांची उपस्थिती होती त्यात शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर भाजपचे खासदार कपिल पाटील तसेच आमदार रविंद्र चव्हाण व आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी उपस्थित होते.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.