नाशिक जिल्ह्यात कोरोनाकड रुग्णांच दुर्लक्ष,श्वास गुदमरत चक्कर येऊन होत आहेत मृत्यु

0

राज्यात कोरोनाची वेगळी लक्षण दिसून येत असून संभाव्य रुग्ण स्वताच्या आजारपणाकडे ठरलेल्या कोरोना लक्षणांशी जुळवून घेतात व स्वताला कोरोना नाही असा निष्कर्ष काढतात.किरकोळ काहितरी अस समजून मेडिकलमधूनच गोळ्या घेतात व कोरोनाची चाचणी करून घेत नाहीत.परिणामी असे रुग्ण गर्दीत,कार्यालयात,बाजारपेठेत फिरत असून त्यांना संसर्ग आहे हे त्यांना स्वतालाच कळत नाही.सुरुवातीला किरकोळ जाणवलेली ही लक्षण दुर्लक्षित करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे.नाशिक जिल्ह्यात रुग्णसंख्या आणि मृत्युदर वाढत असतानाच ही नवीन समस्या निर्माण झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात राज्यातील संचारबंदीचे सर्व नियम काटेकोरपणे राबवण्यात येत आहेत पण कोरोनाची ठरलेली सर्दी,ताप,वास न येण,खोकला अशी लक्षण न आढळता इतर लक्षण आढळल्यास लोक कोरोना चाचणी न करता सार्वजनिक ठिकाणी खुले आम फिरत आहेत.हे रुग्ण उन्हात फिरतात,परिणामी चक्कर येते व श्वास गुदमरून त्यांचा जागीच मृत्यू होत आहे.

तपासणीनंतर या रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझीटिव्ह येत आहे.बाहेर उन्हात न फिरताही वेगळी लक्षण जाणवणारे हे रुग्ण अचानक अत्यावस्थ होत श्वास घ्यायला त्रास होत रुग्णालयात नेऊन व्हेंटिलेटर लावण्यापूर्वीच मृत्युमुखी पडत आहेत.काल दिवसभरात नाशिक शहरात ९ जणांचा अशाप्रकारे चक्कर येऊन पडत श्वास गुदमरून मृत्यू झाला आहे.महिनाभरात नाशिकमध्ये अशा लक्षणान ५०जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात अशाप्रकारे कोविड स्थिती अधिकच चिंताजनक होत असून राज्यशासनाने लावलेले कोणतेही निर्बंध कोरोना साखळी तोडण्यास असमर्थ ठरत आहेत.अशावेळी कोरोनावरील उपाययोजना वाढवण्यात,लसीकरण वाढवण्यास शासन प्राधान्य देत आहे,परंतु कोरोना साखळी तोडून रुग्णसंख्या कमी करण्यासाठी गर्दी नियंत्रणात येण गरजेच ठरल असून आणखीन कडक निर्बंध लावत अगदी अत्यावश्यक सेवा सोडून बाकी सर्व अस्थापना किमान८ दिवस बंद ठेवण गरजेच होत आहे.जेणेकरून कोरोना व्यवस्थापन सुरळीत होईल व आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होत कोरोना उपाययोजनांना गती येईल.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.