नाशिकमध्ये भाजप – शिवसेनेत कलगी तुरा राष्ट्रवादीन घेतली शहर हिताची भूमिका

0

नाशिक महापालिकेकडून त्रिमूर्ती चौक व मायको सर्कल येथे नव्याने तयार होत असलेल्या उड्डाणपुलाच्या वाढीव ४४ कोटींच्या किमतीवरून शिवसेना व भाजपमध्ये कलगी तुरा सुरू असतानाच या वादात आता शहर राष्ट्रवादी काँग्रेसने उडी घेतली आहे.पुलाचे काम तातडीने थांबविण्याबरोबरच दर्जेदार संस्थांकडून सल्ला घेऊनच काम करावे, अशी मागणी राष्ट्रवादीने महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे केली आहे.

त्र्यंबक रोडवरील मायको सर्कल जंक्शन व सिटी सेंटर ते त्रिमूर्ती चौक अशा दोन्ही ठिकाणी सुमारे २५० कोटीचे उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. शहरात होणाऱ्या विकासकामात राष्ट्रवादी काँग्रेसने कधीही अडथळा निर्माण केला नाही. परंतु, सदर उड्डाणपुलाच्या अंतिम किमतीत ४४ कोटी रुपयांची वाढ करण्याचा प्रस्ताव आला आहे. दोन्ही उड्डाणपुलासाठी नेमलेल्या सल्लागारास पूल उभारण्याचा कुठलाही अनुभव नसताना त्यांच्याकडून रचना व अंदाजपत्रक तयार करण्यात आले. त्यामुळे पुलाचे काम तातडीने थांबवावे. तसेच एल. ॲन्ड टी, टाटा किंवा आयआयटी या दर्जेदार संस्थेकडून सल्ला घेऊन तांत्रिक बाबींची तपासणी करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी केली.

एकूणच या पुलावरून शिवसेना भाजपमध्ये आपसातच जुंपलेली असताना राष्ट्रवादीन मात्र शहरविकास व हिताची भूमिका घेत कामाचा दर्जा तसेच वाढीव किंमतीचा योग्य वापर व्हावा यादृष्टीने भूमिका घेतलेली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.