पुण्यात लक्ष्मी रोडवर व्यापारी वर्गाच आंदोलन, दुकान बंद ठेवण्यास विरोध परिस्थिती चिघळली

0

पुण्यात दिवसेंदिवस कोरोना परिस्थिती गंभीर होत असून पुणे शहरासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे.पुण्यात नोकरी, शिक्षण, व्यवसाय यानिमित्ताने अनेक परगावी तसेच परप्रांतीय लोकांची गर्दी आहे.यासर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोनदा बैठक घेत पुणे जिल्ह्यात कोरोना नियमावली व उपाययोजना तयार करून राबवल्या होत्या तसेच नियम पाळण्याची आवाहन केल होत.परंतु राज्यात कोरोनाचा दुसरा स्ट्रेंथ आल्याने कोविड रुग्ण संख्या 60 टक्के अधिक वेगाने वाढू लागली आहे.पुण्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणही वेगात चालू आहे.परंतु सणवार व जत्रा यांमुळे गर्दी वाढत आहे त्यातच गुढी पाडवा आल्याने लोकांची खरेदीसाठी झुंबड उडू लागली आहे.

पुण्यात वाढती गर्दी आणि वाढती कोरोना रुग्णसंख्या या त्रासदीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मिनी लॉकडाऊन लावण्यात आला आहे.कडक निर्बंध ठेवण्यात आले आहेत.रात्री संचारबंदी व दिवसा जमावबंदी लागू करण्यात आली आहे.दुकानांना ठराविक वेळेत बंधन घातले गेल आहे. परंतु तरीही गर्दी नियंत्रित होईना परिणामी दुकान बंद करण्याचे आदेश देण्यात आले.यावर व्यापारी वर्ग आश्क्रमक झाला असून पुण्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या लक्ष्मी रोडवर व्यापाऱ्यांनी आंदोलन सुरू केल असून व्यापाऱ्यांनी हातात निषेधाचे बोर्ड हातात घेतले आहेत.मिनी लॉकडाऊन म्हणत शासनाने दुकान बंद करायला लावून व्यापारी वर्गावर अन्याय केला असून अगोदरच गतवर्षीच्या टाळेबंदीन व्यापार बुडाला आहे,तसच दुकान बंद ठेवल्यान कोविड कमी होतो हा समज खोटा आहे,असही व्यापारी प्रतिनिधीनी सांगितल.आधीच मंदी असून व्यापार कमी आहे त्यामुळ दुकान बंद राहिल्यास कर्जाचे हप्ते,लाईट बील, दुकान भाग आम्ही भरारी कस असा दुकानदारांचा सवाल आहे.

यावर राज्यशासन काय भूमिका घेते हे महत्वाच आहे.शरद पवारांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितल,राज्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काही पावर उचलली असून निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांना विचारूनच निर्बंध लावले होते.तरी सर्व वर्गांनी धीर धरत येणाऱ्या परिस्थितीत शासनाला सहकार्य कराव.संबंधित प्रश्नांवर निश्चितच तोडगा काढला जाईल.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.