अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीची शिवसेनेला साथ सभागृहनेते पद जिंकत केली भाजपवर मात

0

अहमदनगर महापालिकेत शिवसेना व राष्ट्रवादीच वर्चस्व असल्याचे बघायला मिळत आहे. आधी राष्ट्रवादीच्या साथीने शिवसेनेन भाजपकडे असलेले महापौरपद मिळवले. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचे पद म्हणून समजले जाणारे सभागृह नेतेपदही शिवसेनेने आपल्याकडे खेचून महापालिकेत वर्चस्व स्थापन केले आहे.सध्या महापालिकेत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे. त्यांना काँग्रेसचे चार व बसपचे चार नगरसेवक यांचा पाठिंबा आहे. या नवीन राजकीय समीकरणामुळे महापालिकेतील स्थायी समिती सभापती वगळता सर्व पदे बदलत आहेत.

याच पार्श्वभूमीवर अहमदनगर महापालिकेच्या सभागृह नेतेपदी शिवसेनेचे नगरसेवक अशोक बडे यांची नियुक्ती करुन महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.याप्रसंगी माजी उपमहापौर अनिल बोरुडे, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक गणेश कवडे, श्याम नळकांडे, संग्राम कोतकर, दत्ता सप्रे, अमोल येवले, मदन आढाव, आकाश कातोरे, भालचंद्र भाकरे आदी उपस्थित होते. महापौर शेंडगे म्हणाल्या, अहमदनगर महापालिकेच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले जात असून, यात नगरसेवकांची भूमिका महत्वाची आहे. विविध विषयांवर मनपा सभांमध्ये होणार्या चर्चेतून अनेक प्रश्न निकाली काढण्यात आले आहेत.

निवडीनंतर सभागृहनेते अशोक बडे म्हणाले, महापौर रोहिणी शेंडगे व सर्व नगरसेवकांच्या पाठिंब्याने माझी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.या पदाच्या माध्यमातून नागरिकांचे विविध प्रश्न सोडविण्याबरोबर महानगरपालिकेच्या कार्यात चांगले योगदान देण्याचा प्रयत्न करु. पदाधिकारी व अधिकारी यांच्यात समन्वयातून नगरच्या विकासाला पहिले प्राधान्य देऊ.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.