
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या खांद्यावर मराठा समाजाची महत्त्वपूर्ण जबाबदारी
सारथी संस्थेला भरभक्कम निधी मागील काळात अजित पवार यांनी दिला आहे. सारथी ही संस्था विजय वडेट्टीवार यांच्याकडे होती. त्यांच्या काळात संस्थेवर आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात झाले. त्याच कालावधी मध्ये यावर तोडगा काढत अजित पवार यांनी सारथी संस्थेला निधी देण्याचा शब्द दिला होता. जितक्या जबाबदारीने शब्द दिला होत्या त्याच जबाबदारीने निधी देऊन शब्द पाळला होता.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची ध्येय व उद्दिष्ट लक्षात घेत राज्य शासनाने कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाकडील ही जबाबदारी नियोजन विभागाकडे सोपिण्याची मान्यता दिल्याचे राज्य शासनाने सांगितले आहे. साहजिक सारथी संस्थेचा हा सगळा कारभार नियोजन विभागाकडे आला आहे. त्यामुळं जबाबदारी अजित पवार यांच्याकडे आली आहे.
सर्वांच्या नजरा अजित पवार यांच्याकडे लागल्या आहेत की ते आता काय भूमिका घेत संस्थेला कितपत बळकटी देतील. कारण त्यांनी आरक्षणाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द करण्याचा निकाल दिल्याच्या नंतर सांगितले होते की ” आरक्षणाच्या पेक्षा जास्त काही मराठा समाजाला देणार” असे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष अजित पवार यांच्या कडे वेधले आहे.