‘बॉलीवूड मध्ये यायचे असेल तर कष्ट करा’, राणीचा युवतींना सल्ला…

0

‘बॉलीवूड मध्ये यायचे असेल तर कष्ट करा’, राणीचा युवतींना सल्ला…
ब्लॅक, अय्या, मर्दानी, नो वन किल्ड जेसिका, वीर-जारा, हीचकी, यासारख्या चित्रपटातील आपल्या अभिनयाने राणी मुखर्जी चाहत्यांना खुश करत आली आहे. गेल्या 25 वर्षांपासून राणीनं आपल्या अभिनयानं वेगळी उंची गाठली आहे. प्रेक्षकांच्या मनात तिच्याविषयी प्रेम आणि आदर आहे. सध्या राणी चर्चेत असण्याचे कारण म्हणजे तिने बॉलीवूड मध्ये येणाऱ्या युवतींना दिलेला सल्ला.

आपल्या आगळ्या वेगळ्या अंदाजानं बॉलीवूडमध्ये वेगळी जागा निर्माण करणा-या राणी मुखर्जीचं नाव आता टॉपच्या अभिनेत्रींमध्ये घेतले जाते. सुरुवातीला राणीला बॉलीवूडमध्ये पाय रोवण्यासाठी खूप काळ संघर्ष करावा लागला होता. तिला तिच्या आवाजासाठी कुणी चित्रपटात घेत नव्हते. राणीनं आपल्या प्रयोगशीलतेनं सर्वांना जिंकून घेतली. ती कुठल्याही साच्यातल्या भूमिकेमध्ये अडकून पडली नाही. त्यामुळे राणीनं मोठ्या प्रमाणावर लोकांची लोकप्रियता मिळवली. आपल्या नावाचा वेगळा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटवला.

जे नव्यानं बॉलीवूडमध्ये येऊ इच्छितात त्यांनी काही गोष्टी लक्षात घेण्याची गरज आहे. या इंडस्ट्रीमध्ये काम करणे अवघड आहे. बॉ़लीवूड जसे दिसते तसे ते नाही. तिथली परिस्थिती फार वेगळी आहे. एकदा का तुम्ही स्टार झालात त्यानंतर तुमच्याकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढायला लागतात. तुम्हाला नेहमी अलर्ट राहावं लागतं. बेस्ट परफॉर्मन्स द्यावा लागतो. जेवढं चकचकीत दिसतं त्याच्या आत वेगळी दूनिया आहे त्यामुळे पाऊल टाकताना काळजी घ्यावी लागते. याचे भान ठेवायला हवे.असे तिने मार्गदर्शन केले.

आजच्या युवतींना राणीनं सल्ला दिला आहे. त्यांना जर बॉलीवूडमध्ये यायचं असेल तर त्यांनी सतत कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे. तर त्यांना वेगळे स्थान निर्माण करता येईल. कारण बॉलीवूडमध्ये पावला पावलावर प्रचंड संघर्ष आहे. त्याचा सामना करायचा झाल्यास स्वतःला खंबीरपणं राहावं लागेल. आताच्या घडीला आपण काय करु शकतो याचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. अशावेळी नेहमी सकारात्मकता ठेवून वाटचाल केली पाहिजे असेही राणीनं यावेळी सांगितले.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.