“भारताविरुद्ध हरलास तर घरी परत येऊ देणार नाही”.,पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम ला खुली धमकी..!

0

टी२० विश्वचषक २०२१ ची रविवारपासून १७ ऑक्टोबर पासून सुरुवात झाली आहे. संयुक्त अरब अमिराती आणि ओमानमध्ये हे सामने खेळवले जाणार आहेत. भारतीय संघ पाकिस्तानविरुद्धच्या लढतीने टी२० विश्वचषक स्पर्धेचा प्रारंभ करणार आहे.

दुबई येथे २४ ऑक्टोबर रोजी हा बहुप्रतिक्षित सामना रंगणार आहे. कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संघांमधील सामना म्हटलं की, खेळाडूंबरोबरच चाहत्यांच्याही भावना जागृत होतात . अशा परिस्थितीत मात्र पराभवानंतर खेळाडूंचे पोस्टर जाळणे, त्यांच्यावर पातळी सोडून टीका करणे, असे प्रकार घडताना दिसतात.

खरंतर भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील टी२० विश्वचषकाची लढत होण्यापूर्वीही एक असंच प्रकार घडला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याला या सामन्यापूर्वी धमकी मिळाली आहे.टी२० विश्वचषक मोहिमेसाठी पाकिस्तान संघाने युएईला उड्डाण भरली आहे. १५ ऑक्टोबर रोजी हा संघ पाकिस्तानहून युएईला जाण्यासाठी निघाला होता.

यावेळी पाकिस्तानचा कर्णधार आझम याने संघाचा उड्डाण भरण्यापूर्वीचा फोटो ट्वीटरवर पोस्ट केला होता. यावेळी त्याने पाकिस्तानी चाहत्यांकडून त्यांच्या संघाला आणखी जास्त प्रमाणात पाठींबा मिळावा, ही अपेक्षा व्यक्त केली होती.पण बाबर च्या या पोस्टखाली काही चाहत्यांनी खूप संवेदनशील आणि अनपेक्षित अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

त्यात एका चाहत्याने तर त्याला सरळ सरळ धमकीची च प्रतिक्रिया दिली आहे. त्याने प्रतिक्रिया देत लिहिले आहे की, ‘पाकिस्तान संघाला २४ ऑक्टोबर रोजीचा सामना जिंकवून दे. नाहीतर तुला घरी येऊ दिले जाणार नाही.’त्या पाकिस्तान च्या चाहत्याच्या या धमकीने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

घडल्या प्रकारासह पाकिस्तानचा कर्णधार बाबर ची सुद्धा चिंता वाढली असावी. कारण टी२० विश्वचषकातील आकडेवारी पाहता, पाकिस्तानपुढे भारतीय संघाचे पारडे जड राहिले आहे. आतापर्यंत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात टी२० विश्वचषकात ५ सामने झाले आहेत.

या सर्व सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत केले आहे.आणि यावेळेस सुद्धा भारताने सराव सामन्यात ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य संघाला पराभूत केले आहे,त्यामुळे भारतीय संघाला पराभूत करणं हे पाकिस्तान साठी एक आव्हान च असणार आहे.पण पराभूत झाल्यानंतर बाबर आझम ची काय अवस्था होणार याकडे मात्र सगळ्यांच लक्ष वेधून जाईल..!

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.