पाकिस्तानला फुकट लस देता, मग आम्हाला विकत का ?

0

भारताचा सगळ्याच बाबतीत विरोधक हा पाकिस्तान हा देश समजला जातो. भारत पाकिस्तान सीमेवर कायम स्वरुपी तंग वातावरण असतें. इतकेच काय तर भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच असेल तरीही अस्मितेचा विषय होऊन घरा घरात देशभक्तीचे स्फुल्लिंग जागवत मॅच पाहिली जाते. मात्र केंद्र सरकार ने पाकिस्तान साठी पायघड्या घातल्या आहेत लसीच्या साठी असे म्हणायला हरकत नाही.

केंद्र सरकारला कोरोना लस 150 रुपयांना मिळते. मग राज्य सरकारला ती लस 400 रुपये आणि खासगी रुग्णालयांसाठी 600 रुपये प्रति डोस दराने का दिली जाते? मात्र पाकिस्तान आपले विरोधी राष्ट्र आहे त्यांना मात्र फुकट लस दिली जाते. मात्र आपल्याच देशातील राज्यांचा विचार केला तर 400 रुपये दराने लस का ? अशी मागणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे.

पुण्यातील विभागीय आयुक्तांची भेट त्यांनी घेतली. तसेच राज्यातील परिस्थितीचा आढावा घेत त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. या चर्चेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

पाकिस्तानला लस देताना ती फुकट दिली जाते. मात्र देशातील राज्यांचा विचार करायची वेळ येते त्या वेळी मात्र पैसे आकारले जातात. या गोष्टीबद्दल लोकांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी निर्माण झाली आहे. देशातील लसींचा तुटवडा अजून सुरूच आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.